अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सत्ताधारी मोहिते पाटील गटाला आगामी निवडणुकीत धोक्याची घंटा…
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडवणीस यांच्या सरकारच्या निर्णयाने भाजपच्या मोहिते पाटील गटाला दिला घरचा आहेर…
माळशिरस ( बारामती झटका )
अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सत्ताधारी मोहिते पाटील यांच्या गटाला आगामी निवडणुकीत धोक्याची घंटा होण्याची शक्यता आहे. नवीन भाजपच्या विचारांचं सरकार अस्तित्वात आलेले आहे. महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर असताना भाजप, शिवसेना व मित्र पक्षांचे सरकारने घेतलेले अनेक निर्णय रद्द करण्यात आले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडवणीस यांच्या सरकारने बाजार समितीच्या निवडणुकीत खातेदार शेतकऱ्यांना मतदानाचा हक्क देण्यासाठी निर्णय घेतला असल्याने भाजपमध्ये असणाऱ्या मोहिते पाटील गटाला भारतीय जनता पार्टीने घरचा आहेर दिला असल्याची राजकीय वर्तुळामध्ये चर्चा सुरू आहे.
अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गेल्या वेळच्या निवडणुकीमध्ये मोहिते पाटील व मोहिते पाटील सर्व विरोधक एकवटलेले होते. ग्रामपंचायत मतदार संघातून चार संचालक निवडून येत असतात, त्यावेळी कडवे आव्हान उभे राहिलेले होते. थोड्याफार निसटत्या मताने सत्ताधाऱ्यांचा विजय झालेला होता. सोसायटी मतदार संघातून 11 संचालक निवडून येत असतात. सोसायटी मतदार संघात 145 विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या निवडणुका पार पडलेल्या आहेत. त्यामध्ये काही सोसायटी बिनविरोध तर काही सोसायट्यांची निवडणुक होऊन अनेक ठिकाणी सत्तांतर झालेले आहे. बिनविरोध सोसायटीमध्येही अनेक विरोधी गटातील सोसायटीमध्ये संचालक गेलेले होते. एकूण संचालकांची 145 सोसायटी यांची 1885 संख्या होत आहे. काही ठिकाणी राखीव असणारे सदस्य न मिळाल्याने 1830 सदस्य संख्या होती. 1830 सोसायटीचे संचालक 11 कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक निवडून देणार होते. गत निवडणुकीत ग्रामपंचायत मतदार संघात जशी अवस्था झाली, तशीच यंदाच्या निवडणुकीत सत्ताधारी मोहिते पाटील गटाची झाली असती, असे सोसायटीचे संचालक निवडून आलेले आहे होते. मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडवणीस यांच्या भाजप विचाराच्या सरकारने भाजपमध्ये असणारे मोहिते पाटील गटाला एक प्रकारे निवडणुकीत खातेदार शेतकऱ्यांना मतदानाचा अधिकार देण्याचा शासनाने निर्णय घेतलेला असल्याने मोहिते पाटील विरोधी गटाच्या अपेक्षा उंचावलेल्या आहेत.
खातेदार शेतकरी गटामधून 15 संचालक, ग्रामपंचायत गटातून 4 संचालक, व्यापारी गटातून 2 संचालक आणि हमाल तोलार गटातून 1 संचालक असे संचालक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जाणार आहेत.
माळशिरस तालुक्यात लोकसभा, विधानसभा, जिल्हा परिषद, पंचायत समिती, विविध ग्रामपंचायत या निवडणुकीमध्ये मोहिते पाटील गटाकडे व्यापारी, नोकरदार व त्यांच्या संस्थेतील कर्मचारी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यामुळे नेहमी मोहिते पाटील यांचा राजकीय निवडणुकीमध्ये विजय होत गेलेला आहे. तालुक्यातील सर्वसामान्य जनता व शेतकरी यांचा कडाडून विरोध आहे. त्यामुळे शेतकरी खातेदार गटामध्ये माळशिरस तालुक्यात सव्वा ते दीड लाखाच्या आसपास खातेदार मतदार असणार आहे. त्यामध्ये शासनाचे नियम व निकष वेगळे राहणार आहेत. शेतकरी खातेदार किती मतदानाला प्राप्त राहतील यावर निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे. माळशिरस तालुक्यातील शेतकरी व सर्वसामान्य नागरिक यांचा मोहिते पाटील यांना असणारा विरोध पाहता सध्यातरी अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीमधील सत्ताधारी मोहिते पाटील गटाला आगामी निवडणुकीत धोक्याची घंटा वाटत असल्याची राजकीय वर्तुळामध्ये चर्चा सुरू आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng