कृषिकन्यांकड़ून शेती विषयक योजना व विविध मोबाईल ॲप्लिकेशनचे शेतकऱ्यांना मार्गदर्शन
खुड़ूस (बारामती झटका)
श्रीराम कृषी महाविद्यालय पानीव अंतर्गत सुरू असलेल्या ग्रामीण कृषि जागरूकता व औद्योगिक कार्यानुभव कार्यक्रमाच्या माध्यमातून खुडूस येथे कृषिकन्यांकडून शेती विषयक मोबाईल ॲप्लिकेशन विषयक माहिती देण्यात आली. यामध्ये इ-नाम, आय.एफ.एफ.सी.ओ. किसान, माय एपीएमसी, किसान सुविधा, मार्केट यार्ड, ॲग्रो सोल्युशन, डिजिटल मंडी इंडिया, किसान अभिमान यांसारख्या मोबाईल ॲप्लिकेशन्सचा कृषिदैनंदिन जीवनात असलेलं महत्त्व पटवून दिले.
तसेच शेतीविषयक ज्या विविध योजना, भारत सरकारने शेतकऱ्यांसाठी अंमलात आणल्या आहेत. त्याबद्दल देखील मार्गदर्शन करण्यात आले. त्यामध्ये परंपरागत कृषी विकास योजना, प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना अशा विविध योजनांबद्दल माहिती देण्यात आली. मार्गदर्शन करताना विविध माध्यमे व साधनांचा वापर करण्यात आला. उपस्थित बंधू-भगीनिंनी कृषिकन्या घोरपडे पूनम, काळे ऐश्वर्या, पाटील गौरी, बर्गे स्नेहा, गायकवाड शिवानी, हरणावळ सुजाता, हुमणे साक्षी यांचे आभार मानले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
प्रात्यक्षिकासाठी महाविद्यालयाचे कृषी आर्थिक विभागाचे डॉ. राऊत.एस.डी. व ग्रामीण कृषी जागरूकता व औद्योगिक कार्यानुभव कार्यक्रम अधिकारी डॉ. जे.आय. शेख यांचे मार्गदर्शन लाभले.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng