विजयवाडी येथे कृषीकन्यांकडून सहभागी ग्रामीण मुल्यांकन व गावातील विविध क्षेत्रातील लोकांच्या कार्याची माहिती व चर्चा
विजयवाडी (बारामती झटका)
महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी संलग्नित श्रीराम शिक्षण संस्था संचलित श्रीराम कृषी महाविद्यालय, पानीव ता. माळशिरस या महाविद्यालयातील कृषीकन्यांनी विजयवाडी गावात सहभागी ग्रामीण मुल्यांकन या कार्यक्रमांअंतर्गत विजयवाडी गावात विविध क्षेत्रातील माहिती एकत्रित करून ती ग्रामस्थांना कार्यक्रमा दरम्यान सांगितली.
तसेच ग्रामस्थांना त्यांच्या गावातील विविध सोई सुविधा व अडचणी यांची सविस्तर चर्चा केली. या कार्यक्रमात शेतक-यांनी त्यांच्या शेतीविषयक येणाऱ्या विविध योजनांची कृषीकन्यांसमवेत चर्चा केली. या कार्याक्रमामध्ये कु. मिनल ठाकरे, कु. तेजस्विनी चोरमले, कु. ऐश्वर्या केचे, कु. प्रतिक्षा जठार, कु. वैष्णवी धुरुपे, योगिता वायदंडे या कृषीकन्या सहभागी होत्या.
यावेळी विजयवाडी गावाचे सरपंच श्री. उमेश भांडारे व ग्रामसेविका सौ. साठे मॅडम व शेतकरी बांधव उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी श्रीराम शिक्षण संस्था, पानीवचे प्राचार्य श्री. डॉ. एच. बी. हाके, ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रम अधिकारी डॉ. जे. आय. शेख मॅडम यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng