Uncategorizedताज्या बातम्या

राष्ट्रध्वजाची उभारणी करून उपक्रमात सामील होण्याचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांचे आवाहन

११ ते १७ ऑगस्टला जिल्हाभर ‘हर घर झेंडाउपक्रमाचे आयोजन

सोलापूर (बारामती झटका)

भारतीय स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हाभर ११ ते १७ ऑगस्ट २०० यादरम्यान ‘हर घर झेंडा’ हा विशेष उपक्रम राबविला जाणार आहे. यामध्ये नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी केले आहे.

जनतेच्या मनात स्वातंत्र्य लढ्याच्या स्मृती तेवत रहाव्यात, देशासाठी ज्यांनी बलिदान दिले त्या अज्ञात / नायक / क्रांतिकारक यांचे व स्वातंत्र्य संग्रामात घडलेल्या विविध घटना यांचे स्मरण व्हावे, देशभक्तीची जाज्वल्य भावना कायमस्वरूपी जनमानसात रहावी, देशाप्रती भक्तीसह कृतज्ञतेची जाणीव वृध्दिंगत व्हावी या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे.

प्रत्येकांच्या घरावर, सर्व शासकीय कार्यालय/निमशासकीय कार्यालय/संस्थेच्या इमारतीवर, आस्थापनेवर ‘हर घर झेंडा’ हा उपक्रम राबविण्यासाठी राष्ट्रध्वजाची उभारणी करून उपक्रमात सामील होण्याचे आवाहन श्री. शंभरकर यांनी केले आहे.

राष्ट्रध्वज लावण्याबाबत मार्गदर्शक सूचना
• ज्याठिकाणी ध्वज लावण्यात येईल अशा प्रत्येक ठिकाणी त्याची प्रतिष्ठा राखून तो स्पष्टपणे दिसेल
• अशा रीतीने लावला पाहिजे.
• जेव्हा खिडकीची कड, सज्जा अगर इमारतीचा पुढील भाग अशा ठिकाणी आडव्या किंवा तिरक्या
• बसविलेल्या काठीवरुन ध्वज फडकविण्यात येतो तेव्हा ध्वजाची केशरी रंगाची बाजू काठीच्या वरच्या
• टोकाकडे असावी.
• जेव्हा ध्वज भिंतीवर सपाट व आडवा लावण्यात आला असेल तेव्हा ध्वजातील केशरी रंगाचा पट्टा सर्वात
• वर असावा. आणि जेव्हा ध्वज उभा लावण्यात आला असेल तेव्हा ध्वजातील केशरी रंगाचा पट्टा त्याच्या
• (ध्वजाच्या) उजव्या बाजूस असावा म्हणजे ध्वजाकडे तोंड करून उभ्या असलेल्या व्यक्तीच्या डाव्या बाजूस
• असावा.
• फाटलेला अथवा चुरगळलेला ध्वज लावता कामा नये.
• दुसरा कोणताही ध्वज अगर पताका राष्ट्रध्वजापेक्षा उंच किंवा राष्ट्रध्वजावर आणि यात यापुढे तरतूद केली
• असेल ते खेरीजकरुन त्याच्या बरोबरीने लावू नये; तसे ज्या काठीवर ध्वज फडकत असेल त्या काठीवर
• किंवा त्या काठीच्या वरच्या टोकावर फुले किंवा हार यांसह कोणतीही वस्तू ठेऊ नये अथवा बोधचिन्ह लावू
• नये.
• ध्वजाचा एखाद्या इमारतीचे आच्छादन म्हणून वापर करता येणार नाही;
• ध्वजाचा” केशरी रंगाचा पट्टा खालच्या बाजूस येईल अशाप्रकारे जाणीवपूर्वक ध्वज लावता येणार नाही.
• ध्वज फाटेल अशा पध्दतीने लावू नये अथवा बांधू नये.
• ध्वजावर कोणत्याही प्रकारची अक्षरे लिहिता येणार नाहीत;
• ध्वजाचा कोणतीही वस्तू घेण्याचे, देण्याचे, बांधण्याचे किंवा वाहून नेण्याचे साधन म्हणून वापर करता
• येणार नाही;
• ध्वजाचा वक्त्याचा टेबल (डेस्क) झाकण्यासाठी वापर करता येणार नाही किंवा वक्त्याच्या व्यासपीठावर
• आच्छादता येणार नाही;
• ध्वजाचा जाहिरातीच्या कोणत्याही स्वरुपात वापर करता येणार नाही अथवा ध्वज फडकाविण्यात
• आलेल्या ध्वजस्तंभाचा एखादे जाहिरात चिन्ह लावण्यासाठी वापर करता येणार नाही.
• ध्वज फाटला असेल अथवा मळल्यामुळे खराब झाला असेल तर तो कोठेतरी फेकून देऊ नये अथवा
• त्याचा अवमान होईल अशा रीतीने त्याची विल्हेवाट लावू नये. परंतु अशा परिस्थितीत ध्वज खाजगीरित्या
• शक्य तर जाळून किंवा त्याचा मान राखला जाईल अशा अन्य रितीने तो संपूर्णतः नष्ट करावा.

या सूचनांचे सर्वांनी पालन करणे गरजेचे आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

Leave a Reply

Back to top button