Uncategorizedताज्या बातम्या

फलटण-पंढरपूर रेल्वेसाठी लवकरच निधीची तरतूद

खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी घेतली रेल्वेमंत्र्यांची भेट

फलटण (बारामती झटका)

फलटण-पंढरपूर हा रेल्वे मार्ग सुरू व्हावा, यासाठी शंभर वर्षांपासून प्रयत्न सुरू आहेत. इंग्रजांच्या काळामध्ये जमिनीचे अधिग्रहण झाले आहे. देशाच्या अमृत महोत्सवी वर्षांमध्येसुद्धा हे काम अजूनपर्यंत पूर्ण होऊ शकले नाही. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य व केंद्र शासनाच्या बरोबरच पन्नास टक्के वाटा उचलायला तयार आहे, अशा पद्धतीचे पत्रही केंद्र सरकारकडे पाठवले होते. परंतु, राज्यामध्ये महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर त्यांनी याबाबत कोणतीही भूमिका घेतली नाही.

जमिनीचे अधिग्रहण व सर्वेक्षण पूर्ण होऊन सुद्धा पुढे कोणतीही कार्यवाही झाली नाही. आता महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा भाजपाचे सरकार आल्यामुळे महाराष्ट्रातल्या व देशातील पांडुरंगाच्या भक्तांच्या आशा पल्लवी झाल्या आहेत.

मोदी सरकारने पुणे-फलटण रेल्वे सुरू करून निम्मे काम पूर्ण केले आहे. फलटण-पंढरपूर रेल्वे सुरू झाल्यास संपूर्ण देशातून पंढरपूरमध्ये भाविक येण्यास याची मदत होईल, याची संपूर्ण माहिती खा. रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांनी दोन्ही मंत्री महोदयांच्या निदर्शनास आणून दिली. याबाबत केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी तातडीने याबाबतीत वरिष्ठ अधिकाऱ्यांना सूचना देऊन निधी देण्याबाबत लवकरच बैठक घेण्याची सूचना करण्यात आली आहे.
आर्थिक विकासाला मिळणार चालना

फलटण-पंढरपूर रेल्वे सेवा सुरू झाल्यास पंढरपूरच्या विकासाला चालना मिळणार आहे. कर्नाटक, गोवा, तेलंगण, आंध्र प्रदेश या राज्यातून लाखो भक्त हे पंढरपूरमध्ये दरवर्षी येत असतात. ही रेल्वे सुरू झाल्यास लाखो भक्तांना याचा फायदा होणार आहे. शिवाय या भागातील बेरोजगार युवकांच्या हाताला मोठ्या प्रमाणामध्ये रोजगार उपलब्ध होईल. त्यामुळे आर्थिक विकासाबरोबरच सर्वांगीण विकास होईल, असेही खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी यावेळी सांगितले.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

Leave a Reply

Back to top button