विरोधी पक्षनेते अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त माळशिरस शहरात अनोख्या सामाजिक उपक्रमाचे आयोजन.
सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा चिटणीस व माजी नगरसेवक मारुती उर्फ आप्पासाहेब देशमुख यांच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन
माळशिरस ( बारामती झटका )
राज्याचे माजी उपमुख्यमंत्री व विद्यमान विरोधी पक्ष नेते अजितदादा पवार यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त माळशिरस येथे सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा चिटणीस व माळशिरस नगरपंचायतीचे माजी नगरसेवक मारुती उर्फ आप्पासाहेब देशमुख यांनी अनोख्या सामाजिक उपक्रमाने अजितदादांचा वाढदिवस साजरा केला.

अजितदादांचा वाढदिवस करताना समाजातील सर्वसामान्य व उपेक्षित घटकाला याचा फायदा व्हावा, यासाठी माळशिरसमधील अभिनव मूकबधिर निवासी विद्यालयातील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले. त्यामध्ये वह्या, पेन, पेन्सिल, रबर असे साहित्य देऊन आरोग्याच्या दृष्टीने त्यांचं आरोग्य स्वच्छ राहण्याकरिता साबण सुद्धा देण्यात आले. यामुळे शाळेतील मुकबधिर विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद तरळत होता.
सदर अभिनव उपक्रमाच्या प्रसंगी माळशिरस नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष शिवाजीराव देशमुख राष्ट्रवादीचे नेते विकासदादा धाईंजे, नगरसेवक रघुनाथ चव्हाण, युवा नेते उद्योजक गोरख देशमुख, रणजीत बोकफोडे, शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.


नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng
