प्राची लटके हिची राज्यस्तरीय गोळा फेक स्पर्धेसाठी निवड
माढा (बारामती झटका)
माढा तालुक्यातील कापसेवाडी-हटकरवाडी येथील श्री संत गाडगेबाबा माध्यमिक विद्यालयातील इयत्ता आठवीतील खेळाडू प्राची दत्तात्रय लटके हिने शनिवारी दि. 23 जुलै रोजी सोलापूर येथे जिल्हा अथलेटिक्स असोसिएशनच्या वतीने घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय गोळा फेक स्पर्धेत चतुर्थ क्रमांक पटकाविला असून उस्मानाबाद येथे होणाऱ्या राज्यस्तरीय गोळा फेक स्पर्धेसाठी तिची निवड झाली आहे.
प्राची लटके हिने 14 वर्षे वयोगटात 3 किलो वजनी गोळा फेक स्पर्धेत मुलींच्या गटात 5.34 मीटर गोळा फेक करून चमकदार कामगिरी केली आहे. याकरिता तिला क्रीडाशिक्षक सचिन क्षीरसागर यांचे मार्गदर्शन लाभले. ग्रामीण भागातील एका होतकरू खेळाडूची निवड राज्यस्तरीय स्पर्धेसाठी झाल्याबद्दल तिचे सर्वत्र कौतुक होत असून विद्यालयाचा नावलौकिक नक्कीच उंचावला आहे.

यशाबद्दल तिचे अभिनंदन आमदार बबनराव शिंदे, जिल्हा दुध संघाचे चेअरमन तथा संस्थेचे मार्गदर्शक रणजितसिंह शिंदे, सचिव प्रणिता शिंदे, गटशिक्षणाधिकारी बंडू शिंदे, केंद्रप्रमुख रोहिदास कापसे, प्रभारी मुख्याध्यापक प्रविण लटके, तुकाराम कापसे, तनुजा तांबोळी, शिवाजी भोगे, सुनील खोत, सुधीर टोणगे, लहू गवळी, सागर राजगुरू यांच्यासह ग्रामस्थ, पालक, शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी व सदस्यांनी केले आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

