Uncategorizedताज्या बातम्याराजकारण

आठवले साहेबांना द्रोणाचार्य मानून एकलव्याप्रमाणे मरेपर्यंत काम करु – नंदकुमार केंगार

रिपाइं आठवले माळशिरस तालुका कार्यकारिणी निवड मोठ्या दिमाखात संपन्न

माळशिरस (बारामती झटका)

आठवले साहेबांनी सांगितलेला साठ चाळीसचा फाॅर्मुला राबवून आम्ही बाबासाहेबांच्या विचारांचा रिपब्लिकन पक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदासजी आठवले साहेब यांच्या नेतृत्वाखालील सोलापूर जिल्ह्यातील सर्व जाती धर्मापर्यंत पोहचवण्यासाठी पँथर चळवळीपासून प्रामाणिक प्रयत्न करत आहोत. त्या प्रयत्नांना यश म्हणुन सोलापूर जिल्ह्यामध्ये अनेक नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, उपसभापती, सरपंच, तसेच ग्रा.पं. सदस्य निवडून आणले आहेत. चळवळ करत असताना समाजासाठी अनेक केसमध्ये कित्येकवेळा जेलमध्ये गेलो. तरीही बाबासाहेबांचा विचार आणि आठवले साहेबांना कधी सोडलं नाही आणि मरेपर्यंत सोडणार ही नाही, असे वक्तव्य रिपाइं आठवले गटाचे राज्य उपाध्यक्ष नंदकुमार केंगार यांनी केले. माळशिरस तालुक्यातील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाच्या कार्यकारणीची निवड रिपाइं सोलापूर जिल्हा अध्यक्ष व मोहोळ पंचायत समिती उपसभापती अशोक सरवदे यांच्या अध्यक्षतेखाली अकलूज येथे अन्नपूर्णा सांस्कृतिक भवन येथे पार पडली. यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमावेळी मातंग, होलार, नाभिक, मुस्लिम समाजातील अनेक कार्यकर्त्यांनी पक्ष प्रवेश केला.यावेळी अनेकांनी आपलं मनोगत व्यक्त केले.

पुढे बोलताना रिपाइं आठवले गटाचे राज्य उपाध्यक्ष नंदकुमार केंगार म्हणाले की, आठवले साहेबांनी सांगितलेल्या सोलापूर जिल्ह्यातील सध्याच्या एकीकरणाच्या घडामोडीत काही स्वाभिमानी कार्यकर्त्यांना पदाधिकारी निवड प्रक्रियेपासून बाजूला ठेवायच आणि आपल्या सोयीचे पदाधिकारी निवडायचे, ही गोष्ट प्रामाणिक कार्यकर्त्याला पटली नाही. जाणीवपूर्वक द्वेष भावनेने आमच्यासारख्या आठवले साहेबांसाठी आयुष्य घालवलेल्या कार्यकर्त्यांना पक्षात राहुच नये, अशा पद्धतीची भुमिका ठेऊन ८०% प्रामाणिक कार्यकर्त्यांना सोलापूर जिल्ह्याच्या पदाधिकारी निवडीपासून बाजुला ठेवलं आहे. जो कार्यकर्ता स्वाभिमानाची भाषा वापरेल, लढण्याची भाषा वापरेल, अशा कार्यकर्त्याला पक्षातुन हाकलपट्टी करण्याची भुमिका वरीष्ठ नेत्यांनी अनेकवेळा केली, हे कुठतरी थांबलं पाहिजे असे ही ते म्हणाले.

तसेच रिपाइं जिल्हा सरचिटणीस व सांगोल्याचे नगरसेवक सुरज बनसोडे यांनीही यावेळी आपलं मनोगत व्यक्त केले. ते म्हणाले की, जिल्हा कार्यकारिणी निवडत असताना ज्यांनी आम्हाला विचारात घेतलं नाही त्यांना आम्हीच विचारत नाही. फक्त आठवले साहेब आमचा नेता आहे. इतरांनी आमचा नेता बनण्याचा प्रयत्नही करु नये. एकीकडे सांगायचे दोन्ही गट एकत्र करूया तर दुसरीकडे स्वतःच मनमानी कारभार करुन प्रत्येक तालुक्यात प्रामाणिक पदाधिकारी न निवडता निवडणुकीच्या तोंडावर आपला खिसा गरम करण्यासाठी परत परत तेच एजंट निवडीचा सपाटा लावलाय, असंही ते म्हणाले.

तसेच यावेळी अनेक राज्य, पश्चिम महाराष्ट्र, जिल्हा व तालुक्यातील नेत्यांनी आपले विचार व्यक्त केले. या कार्यकारणी निवडीमध्ये जिल्हा अध्यक्ष अशोक सरवदे यांची जिल्हा अध्यक्ष म्हणून बिनविरोध फेर निवड करण्यात आली. तसेच युवक जिल्हाध्यक्ष म्हणून यशपाल कांबळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. प. म. संघटक अरुण बनसोडे तर सांगोला तालुका अध्यक्ष नगरसेवक सुरज बनसोडे, सांगोला तालुका युवक अध्यक्ष पदी होवाळ यांची निवड करण्यात आली. माळशिरस तालुका अध्यक्ष धनाजी पवार, तालुका सरचिटणीस बादल सोरटे, तालुका कार्याध्यक्ष पप्पू गायकवाड यांच्या सर्वानुमते फेर निवडी करण्यात आल्या. तसेच नुतन माळशिरस तालुका युवक अध्यक्ष पदी रविराज बनसोडे, तालुका युवक सरचिटणीस प्रेमसिंह कांबळे पाटील, तालुका युवक कार्याध्यक्ष मिलिंद गायकवाड अशा अनेक कार्यकर्त्यांच्या निवडी यावेळी करण्यात आल्या.

या कार्यक्रमाला राज्य उपाध्यक्ष नंदकुमार केंगार, प.म. उपाध्यक्ष नागेश कांबळे, जिल्हा अध्यक्ष अशोक सरवदे, राज्य संघटन सचिव दिपक चंदनशिवे, सुरज बनसोडे, शामराव भोसले, ज्ञानदेव कांबळे पाटील, अरुण बनसोडे, भारत आठवले, प्रकाश सावंत, भारत शिंदे, संतोष सर्वगोड यांच्यासह माळशिरस तालुक्यातील शेकडो कार्यकर्ते या कार्यक्रमाला उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी माळशिरस तालुक्यातील सर्व रिपब्लिकन कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

3 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button