सुधीर शामराव भोसले यांची आर.पी.आय. युवक आघाडीच्या माळशिरस तालुका उपाध्यक्ष पदी निवड
महाळुंग (बारामती झटका)
महाळुंग ता. माळशिरस येथील मा. रामदासजी आठवले साहेब यांचे कट्टर समर्थक सुधीर शामराव भोसले यांची अकलूज याठिकाणी झालेल्या तालुका कार्यकारणी बैठकीत आर.पी.आय. युवक आघाडीच्या माळशिरस तालुका उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली.
समाजाच्या प्रश्नांवर रस्त्यावर उतरून ते आंदोलन करत आहेत. गेली दहा वर्ष ते पक्षासाठी काम करत आहेत. जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी ते नेहमीच प्रयत्नशील असतात. त्यांनी अनेक प्रकारचे उपोषण, रास्ता रोको, गावातील रस्ते, अपंग बांधवांचे प्रश्न, घरकुल बाबत अडीअडचणी या बाबतीत पुढे होवुन प्रश्न सोडविले आहेत.

महापुरुषांच्या जयंती, पुण्यतिथी साजरी करत असताना समाज उपयोगी कार्यक्रम राबवून घेतले आहेत. त्यांचे पक्षाची ध्येय धोरणे जनतेपर्यंत पोहोचवण्याचे काम युवकफळीच्या माध्यमातून जोरात चालू आहे. आपल्या समाजकार्यातून सुधीर भोसले यांनी वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यामुळे सर्व परिचित आहेत. पक्षाने दिलेली जबाबदारी ते यशस्वीपणे पार पाडत आहेत.
सदर कार्यक्रमावेळी राज्य उपाध्यक्ष नंदकुमार केंगार, पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष नागेश दादा कांबळे, जिल्हाध्यक्ष अशोक सरोदे, सुरज दादा बनसोडे, दीपक चंदनशिवे, शामराव भोसले, युवराज वाघमारे, भारत आठवले, अरुण बनसोडे, संतोष सर्वगोड, दत्तू कांबळे पाटील, धनाजी पवार, रोहित सोरटे व माळशिरस तालुक्यातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng
