भारतीय जनता युवा मोर्चाच्या माळशिरस तालुका सरचिटणीस पदी फोंडशिरस गावचे युवा नेते तेजस गोरे यांची नियुक्ती
माळशिरस तालुक्याच्या पश्चिम भागात भारतीय जनता युवा मोर्चाला तेजस गोरे यांच्या निवडीने अच्छे दिन येणार…
फोंडशिरस ( बारामती झटका)
भारतीय जनता पक्षाची माळशिरस येथील शासकीय विश्रामगृह येथे बैठक संपन्न झाली. यावेळी के. के. पाटील भाजपा जिल्हा सहप्रभारी, सोपान नारनवर जिल्हा उपाध्यक्ष, बाळासाहेब सरगर जिल्हाध्यक्ष भाजपा किसान मोर्चा, हनुमंतराव सूळ, बाळासाहेब वावरे, बी. वाय. राऊत, मुक्तार कोरबू, बाळासाहेब लवटे पाटील, संदीप पाटील, लक्ष्मण गोरड, तालुका संघटन सरचिटणीस संजयजी देशमुख, युवा मोर्चा तालुका अध्यक्ष दादासाहेब खरात, उद्योजक दत्तात्रय शेळके, विनोद गोरे, लक्ष्मण माने, राहूल मदने, राजेंद्र वळकुंदे, उद्योजक सतीशतात्या ढेकळे, हनुमंत कर्चे, भैैय्यसाहेब चांगण, युवा नेते मनोज जाधव, सुनील बनकर, युवराज वाघमोडे, बलभीम जाधव, मिनीनाथ मगर, लाला साळवे आदी तालुक्यातील सर्व पदाधिकारी यांची बैठक संपन्न झाली.
या बैठकीत भारतीय जनता युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष दादासाहेब खरात यांनी फोंडशिरस गावचे युवा नेते तेजस ज्ञानदेव गोरे यांची भारतीय जनता युवा मोर्चाच्या तालुका सरचिटणीस पदी निवड करून नियुक्ती पत्र देण्यात आले आहे.
यावेळी सुनील बनकर, मनोज जाधव, सुनील गोरे, विजय गोरे, आकाश मिसाळ, अनुपम रावते, बाळासाहेब गायकवाड, अर्जुन गोरे यांच्यासह भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
तेजस गोरे यांनी गेल्या दहा वर्षांपासून माळशिरस तालुक्यातील पश्चिम भागात भारतीय जनता पक्षाचे काम जोमाने केलेले आहे. त्यांना वेळोवेळी युवा नेते मनोज जाधव व सुनील बनकर यांचे मोलाचे सहकार्य लाभत असते. तेजस गोरे यांनी फोंडशिरस येथील क्रांतीसुर्य प्रतिष्ठानच्या वतीने परिसरात अनेक सामाजिक व लोकोपयोगी कार्यक्रम आयोजित केले आहेत. त्यावेळी युवकांचे संघटन करून कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी तेजस गोरे यांचा सहभाग असतो.
माळशिरस तालुक्याच्या पश्चिम भागात तेजस गोरे यांचा जनसंपर्क दांडगा आहे. युवकांचे संघटन जोरदार असल्याने माळशिरस तालुक्याच्या पश्चिम भागात भारतीय जनता युवा मोर्चाला अच्छे दिन येणार आहेत.
तेजस गोरे यांच्या निवडीने तरूण वर्गात आनंदाचे वातावरण निर्माण झालेले आहे. तेजस गोरे यांच्यावर सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव सुरू झाला आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng