माळशिरस येथे भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन माळशिरस तालुका कार्यकारिणीची मासिक सभा संपन्न
माळशिरस (बारामती झटका)
माळशिरस येथील शासकीय विश्रामगृहात भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन माळशिरस तालुका कार्यकारिणीची मासिक सभा दि. 4/8/2022 गुरुवार रोजी सकाळी 11 वाजता सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष भिमराव फुले यांच्या अध्यक्षतेखाली अनेक पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पार पडली. या मीटिंगवेळी माळशिरस तालुका अध्यक्ष पांडुरंग फुले, माळशिरस तालुका उपाध्यक्ष विजयकुमार नेवसे, तालुका सचिव नामदेव दगडू पाटील, तालुका सहसचिव दत्तात्रय दादा भोसले, सदस्य शिवराम गायकवाड, तसेच अकलूज शहर भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलनचे शहराध्यक्ष बाबासाहेब प्रदीप कारंडे, अरुण बबन ढगे व आकाश पराडे पाटील आदी कार्यकर्ते यांच्या उपस्थिती मीटिंग पार पडली.
या मीटिंगमध्ये मागील सभेचे प्रोसिडिंग सचिव पाटील यांनी वाचून दाखवले व मंजूर केले. तसेच विविध विषयावर आरोग्याच्या बाबतीत शासकीय उपजिल्हा रुग्णालय अकलूज व शासकीय ग्रामीण रुग्णालय नातेपुते येथील पाहणी केली असता तसेच रेशन धान्यांच्या बाबतीत काही त्रुटी आढळून आल्या. कार्डधारकाला शासकीय नियमाप्रमाणे धान्य दिले जात नाही, त्या धान्याची पावती कार्डधारकाला देण्यात येत नाही, याबाबत चर्चा झाली. यावेळेस सर्वांच्या तक्रारी जिल्हा उपाध्यक्ष भीमराव फुले तसेच तालुका अध्यक्ष पांडुरंग फुले यांनी ऐकून घेऊन त्या सोडवण्याचे आश्वासन दिले. चहापानानंतर माननीय सचिव पाटील साहेब यांनी सभा संपल्याचे जाहीर केले.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

