जळभावीचे तंटामुक्ती अध्यक्ष भानुदास चोरमले यांची भाजपच्या माळशिरस तालुका उपाध्यक्ष पदी नियुक्ती
भारतीय जनता पक्षाचे गेल्या पंधरा वर्षांपासून माळशिरस तालुक्यात निष्ठेने व प्रामाणिकपणे केले काम
माळशिरस ( बारामती झटका )
भारतीय जनता पक्षाची माळशिरस येथील शासकीय विश्रामगृह येथे बैठक संपन्न झाली. यावेळी के. के. पाटील भाजपा जिल्हा सह प्रभारी, सोपान नारनवर जिल्हा उपाध्यक्ष, बाळासाहेब सरगर जिल्हाध्यक्ष भाजपा किसान मोर्चा, हनुमंतराव सूळ, बाळासाहेब वावरे, बी. वाय. राऊत, मुक्तार कोरबू, बाळासाहेब लवटे पाटील, संदीप पाटील, लक्ष्मणतात्या गोरड, तालुका संघटन सरचिटणीस संजयजी देशमुख, युवा मोर्चा तालुका अध्यक्ष दादासाहेब खरात, उद्योजक दत्तात्रय शेळके, लक्ष्मण उर्फ पिनु माने, राहूल मदने, राजेंद्र वळकुंदे, उद्योजक सतीशतात्या ढेकळे, हनुमंत कर्चे, भैैय्यासाहेब चांगण, युवा नेते मनोज जाधव, सुनील बनकर, युवराज वाघमोडे, बलभीम जाधव, मिनीनाथ मगर, लाला साळवे आदी तालुक्यातील सर्व पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न झाली.
या बैठकीत जळभावी ता. माळशिरस येथील महात्मा गांधी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष व भारतीय जनता पक्षाचे एकनिष्ठ राहिलेले भानुदास लक्ष्मण चोरमले यांची भाजपच्या माळशिरस तालुका उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे. यावेळी जळभावी गावचे विद्यमान सरपंच किसन रामा राऊत उपस्थित होते.

भारतीय जनता पक्षाचे गेल्या पंधरा वर्षांपासून माळशिरस तालुक्यात भाजपचे निष्ठेने व प्रामाणिकपणे काम करत आहेत. माळशिरस तालुक्यातील पश्चिम भागात सुपरिचित असणारे दिलदार व एकनिष्ठ व्यक्तिमत्व आहे. जळभावी गावातील जबाबदार पार्टी प्रमुख आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली गावामध्ये अनेक वेळा सत्ता स्थापन केलेली आहे.
पक्षाची ध्येय धोरणे तळागाळात पोचविण्यासाठी भविष्यात त्यांच्या निवडीने पश्चिम भागात भारतीय जनता पक्षाला अच्छे दिन येणार आहेत. नुतन उपाध्यक्ष भानुदास चोरमले यांच्या निवडीने समर्थकात आनंदोत्सव साजरा करण्यात येत आहे. सोशल मिडीयावर त्यांच्यावर शुभेच्छांचा धुमाकूळ सुरू आहे.


नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng
