कोथळे येथे बाजरी पीक प्रात्यक्षिक निविष्ठा व पोषण आहार मिनीकिट वाटप संपन्न…
कोथळे (बारामती झटका)
महाराष्ट्र शासन कृषि विभाग राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान अंतर्गत मौजे कोथळे येथे बाजरी पीक प्रात्यक्षिक ५ प्रकल्पासाठी निवड झालेल्या १२५ लाभार्थीचे पीक वाढीच्या अवस्थेतील दुसरे प्रशिक्षण ४ ऑगस्ट रोजी संपन झाले. या प्रशिक्षणात प्रकल्पातील लाभार्थींना कोथळे गावचे सरपंच श्री. संतोष गुरव, उपसरपंच श्री. तानाजी किसवे, पोलीस पाटील अमोल आगम यांच्याहस्ते १२५ लाभार्थींना प्रकल्प क्षेत्राप्रमाणे ५० लि. क्विनॉलफॉस, २५ किलो अँट्राझीन व प्रशिक्षण किटचे वाटप करण्यात आले. गावातील ९० कुपोषीत कुटूंबांना राष्ट्रीय पोषण आहार योजनामधून १२ प्रकारचे भाजीपाला बियाणे असलेले मीनीकिटचे वाटप करण्यात आले.
सदर प्रशिक्षणाचे गावचे कृस श्री. लालासो माने यांनी नियोजन, आयोजन व सुत्रसंचालन केले. प्रशिक्षणात श्री. अमीत गोरे कृस यांनी बाजरी पीक एकात्मीक अन्नद्रव्ये व्यवस्थापन व मका लष्करी अळी नियंत्रणाबाबत सविस्तर माहिती दिली. श्री. गोरख पांढरे कृषि पर्यवेक्षक यांनी बाजरी किडरोग व तण नियंत्रणाबाबत सल्ला दिला.
श्री. सतीश कचरे प्र. तालुका कृषि अधिकारी यांनी महाडीबीटी योजना व राज्य यांत्रीकिकरण योजना यामध्ये झालेले बदल लाभार्थीना अवगत केले. श्री. उदय साळूंखे कृषि पर्यवेक्षक यांनी गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेबाबत सखोल मार्गदर्शन केले. त्याच बरोबर श्री. विजय कर्णे कृस यांनी ई पीक पाहणी व श्री. सचीन दिडके कृस यांनी नॅनो युरिया वापर व खत बचत बाबत शेतकरी बांधवांबरोबर चर्चा केली.
कार्यक्रमाच्या शेवटी कु. विद्या माळी कृस यांनी पोषण आहार व भाजीपाला मिनीकिट लागवड बाबत महिती दिली. यावेळी कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन श्री. कांतीलाल यांनी केले. त्यानंतर चहापानानाने कार्यक्रमाची सांगता झाली.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng