श्री शंकर सहकारी साखर कारखान्याची थकीत एफआरपी व कामगारांचे थकीत वेतन त्वरित द्यावे – दत्ताभाऊ भोसले.
अन्यथा श्री शंकर सहकारी साखर कारखान्याच्या विरोधात १५ ऑगस्ट रोजी बोंबाबोंब आंदोलन करण्याचा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुका उपाध्यक्ष दत्ताभाऊ भोसले यांनी कारखान्याचे कार्यकारी संचालक स्वरूप देशमुख यांना निवेदनाद्वारे दिला इशारा
सदाशिवनगर ( बारामती झटका )
स्वाभिमानी शेतकरी संघटना माळशिरस तालुक्याच्या वतीने आज शुक्रवार दि. ०४/०८/२०२२ रोजी श्री शंकर सहकारी साखर कारखाना सदाशिवनगर, ता. माळशिरस कार्यस्थळावर कारखान्याचे कार्यकारी संचालक स्वरूप देशमुख यांना शेतकरी संघटनेचे तालूका उपाध्यक्ष दत्ताभाऊ भोसले यांनी निवेदन दिले आहे.

सदर निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे कि, शेतकऱ्यांचे राहिलेले एफआरपी लवकरात लवकर खात्यावर जमा करा. अन्यथा दि. 15 ऑगस्ट रोजी तहसील कार्यालयावर बोंबाबोंब आंदोलन करण्यात येणार आहे. तसेच मागील थकीत कामगाराची पेमेंट देण्यात यावी अशी मागणीही या निवेदनात करण्यात आली आहे. निवेदन देताना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माळशिरस तालुका उपाध्यक्ष दत्ताभाऊ भोसले, संभाजी बनकर, नवनाथ काळे, विजय करे, आकाश सोनटक्के, पप्पू गाडगे, अण्णा नरोटे आदी उपस्थित होते. दि. १५ ऑगस्ट रोजी सकाळी ठिक ११ वा. आपल्या हक्काच्या पैशासाठी सर्व शेतकरी बांधवांनी उपस्थित राहावे असे आवाहन यावेळी करण्यात आले आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

