बाबासाहेब माने यांचे प्रेरणादायी, सर्व समावेशक नेतृत्वाचा आदर्श समाजातील युवकांनी घ्यावा – कार्याध्यक्ष सत्तार नदाफ
नातेपुते ( बारामती झटका )
कण्हेर ता. माळशिरस गावचे माजी उपसरपंच व राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे माळशिरस तालुका अध्यक्ष बाबासाहेब माने यांनी प्रतिकूल परिस्थितीत प्रेरणादायी काम करीत समाजात आदर्शवत असे सर्व समावेशक नेतृत्व केले आहे. अशा नेतृत्वाचा समाजातील युवकांनी आदर्श घ्यावा, असे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे माळशिरस तालुका कार्याध्यक्ष मुस्लिम समाज संघटनेचे संघटक सत्तारभाई नदाप यांनी बाबासाहेब यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना त्यांच्या कार्याचे व गुणांचे कौतुक केले.
कण्हेर ता. माळशिरस येथील सौ. यशोदा व श्री. नामदेव माने यांच्या शेतकरी व सर्व सामान्य कुटुंबात बाबासाहेब माने यांचा जन्म झालेला आहे. पुर्वीच्या काळी ‘हम दो हमारे दो’ अशी पध्दत नव्हती. मुलं ही देवा घरची फुलं समजली जायची. घरात पहिले आठ भाऊ व तीन बहिणी, बाबासाहेब सर्वात लहान शेंडेफळ आहेत.
सौ. यशोदा व श्री. नामदेव माने यांनी गरीब व प्रतिकूल परिस्थितीत आपल्या मुलांवर चांगले संस्कार केले. त्यामुळे आज समाजामध्ये सर्वच क्षेत्रात माने परिवाराने नाव उज्वल केलेले आहे. सर्व बंधूंनी मिळून गरिब संसाराचा स्वर्ग बनवला. राजकारणामध्ये माने परिवारातील गौतमआबा माने यांनी तरूण वयात गावचे सरपंच पद भूषविले. वीस वर्षे एक हाती सत्ता टिकवली. माळशिरस पंचायत समितीचे सदस्य पाच वर्षे पूर्ण केलेली आहेत. गौतमआबांच्या राजकारणात लक्ष्मणासारखी बाबासाहेब यांनी साथ दिलेली आहे.
बाबासाहेब माने यांनी सुद्धा पैलवानकी बरोबर फायनान्स प्लॉटिंग व्यवसाय सुरू करून आर्थिक स्तोत्र निर्माण केलेले होते. त्यांनी सुद्धा कमी वयामध्ये गावचे उपसरपंच पद भूषविलेले होते. तालुक्याच्या राजकारणामध्ये सक्रिय सहभाग घेऊन लोकसभा, विधानसभा, जिल्हा परिषद, पंचायत समिती अशा निवडणुकांमध्ये त्यांनी युवकांचे संघटन करून अनेक वेळा आंदोलने, मोर्चे करून समाजामध्ये जनजागृती केली होती. युवकांचे संघटन चांगले असल्याने त्यांच्याकडे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष पदाची जबाबदारी आलेली होती. त्यांनी यशस्वीरित्या जबाबदारी पार पडलेली आहे.
माळशिरस तालुक्यामध्ये युवकांचे जाळे निर्माण करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तळागाळात पोहोचविलेला आहे. सर्व समाजातील घटकांना एकत्र घेऊन त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची चळवळ उभा केलेली आहे. भविष्यामध्ये बाबासाहेब माने यांना जनतेची सेवा करण्याची संधी मिळो, हीच वाढदिवसानिमित्त तरुण नेत्याला सत्तारभाई नदाफ परिवार यांच्याकडून हार्दिक शुभेच्छा.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng