Uncategorizedताज्या बातम्या

भांबचे जागृत स्वयंभू शिवलिंग संभाजी बाबा मंदिरात श्रावणी सोमवार निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन.

भांब ( बारामती झटका)

भांब ता. माळशिरस येथे सालाबादप्रमाणे श्रावणी सोमवारनिमित्त श्री. मारुती संभाजी पाटील, रा. भांब यांच्यावतीने श्री संभाजी बाबा पादुका पूजन व समाधी महापूजा सकाळी दहा वाजता संपन्न झाली. श्री संभाजी बाबा पालखीचे आगमन त्यानंतर दहा ते बारा या वेळेत कीर्तन व प्रवचन झाले. दुपारी बारा वाजल्यापासून भाविकांना महाप्रसादाचे आयोजन शिवाजी पाटील, हनुमंत पाटील, मारुती संभाजी पाटील, आजिनाथ पाटील, रणजीत पाटील, रविराज पाटील, दत्तू पाटील, माणिक पाटील, तानाजी पाटील, सुधीर पाटील, सोनाली पाटील, स्नेहल पाटील परिवार उपस्थित होते. श्रावणी सोमवार निमित्त येणाऱ्या सर्व भाविकांना महाप्रसादाचे आयोजन पाटील परिवार यांच्यावतीने करण्यात आलेले होते. दुपारी दोन वाजता संभाजी बाबा देवस्थान समिती व भांब ग्रामस्थ यांच्यावतीने भव्य जंगी कुस्त्याचे मैदान आयोजित केलेले होते.

माळशिरस तालुक्यातील पश्चिम भागाच्या सातारा सरहद्दीवर भांब गावच्या डोंगर कपारीमध्ये स्वयंभू जागृत शिवलिंगाचे संभाजी बाबा मंदिरात खडतर रस्त्याचा प्रवास करून भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला. भांब गावच्या संभाजी बाबा जागृत देवस्थानाला ऐतिहासिक वारसा आहेत. शिवलिंगाची अख्यायिका येथील अनेक जुने लोक सांगत असतात. माळशिरस तालुक्याच्या पश्चिम भागामध्ये लोकांचे श्रद्धास्थान असणारे संभाजी बाबा मंदिर आहे.

भांब गावापासून साधारण चार ते पाच किलोमीटर अंतरावर डोंगर-दऱ्या खोऱ्याच्या कपारीला मंदिराचे स्वयंभू स्थान आहे. शिंगणापूरच्या डोंगररांगा असा पहाडी प्रदेश आहे. निसर्गरम्य ठिकाण आहे. सदर ठिकाणी जाण्यास रस्त्याची मोठी अडचण आहे. तरीसुद्धा भाविक संभाजी बाबा मंदिराच्या भक्ती व श्रद्धेमध्ये कमीपणा करीत नाहीत. खडतर रस्त्याचा प्रवास करून मिळेल त्या वाहनाने किंवा पायी जाऊन लोक भक्तिभावाने दर्शन घेत होते. पावसाची संततधार सुरू असतानासुद्धा भाविकांनी दर्शनाचा व महाप्रसादाचा लाभ घेतला.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

Leave a Reply

Back to top button