माळशिरस तालुक्यात एकच एकच एकच फक्त बैलगाडा शर्यत, बाबासाहेब माने पाटील मित्र परिवाराच्यावतीने भव्य बैलगाडा शर्यतीचे आयोजन
मुंबई, नाशिक, ठाणे, रायगड, पुणे भागातील बैलगाडा मालक, चालक माळशिरस तालुक्यात झाले दाखल
माळशिरस ( बारामती झटका )
राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे माळशिरस तालुका अध्यक्ष श्री. बाबासाहेब माने पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त रविवार दि. 21/08/2022 रोजी भव्य बैलगाडा शर्यतीचे आयोजन बाबासाहेब माने पाटील मित्र मंडळाच्या वतीने करण्यात आलेले आहे. सकाळी ९ वा. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शर्यतीचा शुभारंभ होणार आहे. मुंबई, नाशिक, ठाणे, रायगड, पुणे व इतर भागातून बैलगाडा चालक-मालक माळशिरस तालुक्यात दाखल झालेले आहेत. बैलगाडा शर्यत उत्साहामध्ये संपन्न होणार आहे.
बाबासाहेब माने मित्र परिवाराच्यावतीने वाढदिवसाचे औचित्य साधून जुना बैलपोळा मैदान, म्हसवड रोड, गारवड पाटी, ढाबा येथे बैलगाडा शर्यतीचे आयोजन केलेले आहे. सदरचे मैदान हे शासनाने नेमून दिलेल्या नियमांमध्ये पार पडणार आहे.
सदर बैलगाडा शर्यतीत एक आदत बैल व दुसरा बैल अशी शर्यत राहणार आहे. प्रथम क्रमांक 51,000 रुपये पांडुरंग तात्या पिसे, ग्रामपंचायत सदस्य, गोरडवाडी व सचिन भाऊ माने युवा उद्योजक, मेडद यांच्यावतीने आहे. द्वितीय क्रमांक 31,000 रु. पांडाशेठ कराडे, रसिका हॉटेल पुणे व महादेव नारायण वाघमोडे प्रगतशील बागायतदार यांच्यावतीने आहे. तृतीय क्रमांकाचे 15,000 रु. दादासो यमगर शिवशंभो कन्स्ट्रक्शन भागवत कर्णवर पाटील माजी सरपंच गोरडवाडी, विनोद भाऊ बाळासाहेब खरात निरनिमगाव यांच्या वतीने आहे. चतुर्थ क्रमांकाचे 11,000 रु. बक्षीस मामासाहेब हुलगे माजी सरपंच व देशमुख डॉक्टर इस्लामपूर यांच्यावतीने आहे. पाचव्या क्रमांकाचे 7000 रु. बक्षीस खंडू तात्या कळसुले, गोरडवाडी सेवा सोसायटीचे माजी चेअरमन व बाळासाहेब यमगर शिवशंभो ग्रुपचे अध्यक्ष यांच्यावतीने आहे. सहाव्या क्रमांक 3,000 रुपये सोमनाथ दिलीप सरगर एसएसग्रुप यांच्या वतीने आहे.
सदर बैलगाडा शर्यतीसाठी प्रवेश फी 1000 रु. आहे. सदर बैलगाडी शर्यतीसाठी तात्यासाहेब कचरे 97 63 85 62 43, पांडुरंग तात्या पिसे 99 75 39 34 34, अशोक आप्पा कोळेकर 90 67 49 50 45, संदीप मंजुळे 92 84 30 87 30, बापूराव सरगर 86 05 24 98 70, लक्ष्मण तात्या कोळेकर 93 73 61 78 79 या नंबरशी बैलगाडा चालक-मालक यांनी संपर्क साधावा, असे आवाहन बाबासाहेब माने मित्र परिवाराच्यावतीने करण्यात आलेले आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng
