बांगर्डे येथील जन सुविधा योजनेतून करण्यात आलेल्या रस्त्याच्या निकृष्ट कामाची चौकशी करावी – युवानेते पांडुरंग किसवे
बांगर्डे ( बारामती झटका )
बांगर्डे ता. माळशिरस येथील जन सुविधा योजनेतून करण्यात आलेल्या रस्त्याच्या निकृष्ट कामाची चौकशी करावी, असे बांगर्डे गावचे युवा नेते श्री. पांडुरंग भीमराव किसवे यांनी गटविकास अधिकारी माळशिरस यांच्याकडे निवेदन दिलेले आहे.
सदरच्या निवेदनामध्ये मौजे बांगर्डे फोंडशिरस रस्ता ते शंकर महाराज मंदिर येथे जन सुविधा योजनेतून रस्त्याचे मुरमीकरण व खडीकरण करण्यात आलेले आहे. सदर कामाचा मंजूर आराखडा करीत असताना डीएसआर प्रमाणे झालेले नसून मोठ्या प्रमाणात हलगर्जीपणा करण्यात आलेला आहे. सदरच्या कामांमध्ये अंदाजपत्रकांमधील धरलेले काम केलेले नाही. सदर कामाबाबत कनिष्ठ अभियंता यांच्याकडे १ ऑगस्ट २०२२ पासून फोन व समक्ष भेटून वारंवार तक्रार केली असून त्यांनी फक्त आश्वासन दिले. त्यावर कोणतेही कारवाई केली गेली नाही.
तरी सदर अंदाजपत्रकाप्रमाणे काम पूर्ण झाल्याशिवाय व कामाचा दर्जा पडताळल्याशिवाय सदर ठेकेदारास कोणतेही बिल अदा केले जाऊ नये, असे निवेदन गटविकास अधिकारी यांना देऊन सदरच्या माहितीच्या प्रती मुख्य अभियंता जिल्हा परिषद बांधकाम विभाग क्रमांक एक, मुख्य लेखा वित्त अधिकारी, उपअभियंता जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग माळशिरस, ग्रामसेवक ग्रामपंचायत बांगर्डे यांना निवेदनाच्या प्रति दिलेल्या आहेत.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng