माजी मुख्याध्यापक मल्लिकार्जुन निवृत्तीराव तथा एम.एन.गायकवाड सर यांचे दुःखद निधन…
अकलूज (बारामती झटका)
आनंदनगर ता. माळशिरस, जि. सोलापूर येथील समाजसेवक कै. निवृत्तीराव नामदेवराव गायकवाड यांचे सुपुत्र शिक्षण प्रसारक मंडळ, अकलूज येथील माजी मुख्याध्यापक मल्लिकार्जुन निवृत्तीराव तथा एम.एन.गायकवाड सर यांचे वयाच्या 60 व्या वर्षी गुरूवार दि. 18.08.2022 रोजी सायंकाळी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने आनंदनगर येथील राहत्या घरी निधन झाले.
त्यांनी शिक्षण प्रसारक मंडळाच्या अकलूज, यशवंतनगर, पाटीलवस्ती, मांडवे, कोळेगाव, बोरगाव इ. शाखेत गणित व विज्ञानाचे ज्ञानदान करत सेवा केली. त्यांचे शालेय शिक्षण समावि अकलूज येथे, उच्च माध्यमिक शिक्षण महर्षी शंकरराव मोहिते प्रश्नाला शंकरनगर येथे तर बी.एस्सी, रसायनशास्त्र ते यशवंतराव चव्हाण महाविद्यालय सातारा येथून कमवा आणि शिका योजनेतून झाले होते. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत त्यांनी त्यांचे शिक्षण पूर्ण करून 1985 सालापासून ते शिक्षण प्रसारक मंडळ, अकलूज या संस्थेत ते शिक्षक म्हणून रुजू झाले.
द्वारकाधिश सेवाभावी संस्थेचे ते सचिव होते. द्वारकाधिश सेवाभावी संस्थेमार्फत अनेक मोफत रूग्णोपयोगी शिबिराचे आयोजन, रक्तदान शिबिराचे आयोजन, कोरोनाच्या काळात गरजूंना शिधावाटप तसेच औषधोपचार शिबिराचे आयोजन करून गोरगरीब जनतेसाठी त्यांनी मोलाचे काम केले होते. परिसरातील दहावी नापास विद्यार्थ्यांना ते घरीच गणित, विज्ञान या विषयाची मोफत शिकवणी घेत असत. असे अनेक गरीब विद्यार्थी त्यांनी घडविले आहेत.
तसेच श्री आनंदी गणेश पाणी वापर संस्था, आनंदनगर अकलूजचे संचालक होते. आनंदनगरचे उपसरपंच वसंतराव गायकवाड, व्यसन मुक्त संघाचे नामदेवराव गायकवाड, टेंभुर्णी डॉक्टर्स असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. पांडुंरंग गायकवाड, रोटरी क्लब ऑफ सराठी डिलाईटचे खजिनदार विठ्ठलराव गायकवाड, महाराष्ट्र कौन्सिल ऑफ होमिओपॅथीचे प्रशासकीय सदस्य डॉ. बाळकृष्ण गायकवाड यांचे ते बंधू होते.
त्यांच्या पाठीमागे आई, पत्नी, दोन मुले व एक विवाहित मुलगी असून एक मुलगा, मुलगी, जावई डॉक्टर असून एक मुलगा सी.ए. शिकत आहे. पुतणे, नातू, सूनासह मोठा परीवार आहे. शांत, मितभाषी, गरजूंना अडीअडचणीच्या काळात मदत करणारे एम. एन. गायकवाड सर यांच्या जाण्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng
Your humor added a lot to this topic! For additional info, click here: FIND OUT MORE. What do you think?