Uncategorizedक्रीडाताज्या बातम्यामनोरंजन

समाजरत्न राजेंद्रभाऊ पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य बैलगाडा शर्यतीचे आयोजन.

नातेपुते नगरीचे माजी पोलीस पाटील राजेंद्रभाऊ पाटील यांच्या ७१ व्या वाढदिवसानिमित्त ७१ हजार रुपयाचे प्रथम क्रमांकाचे बक्षीस…

अतुलबापू पाटील, माऊली पाटील, संदीपदादा ठोंबरे मित्र परिवाराच्यावतीने भव्य बैलगाडा शर्यतीचे आयोजन

नातेपुते ( बारामती झटका )

माळशिरस तालुक्यातील नातेपुते नगरीचे माजी पोलीस पाटील समाजरत्न राजेंद्रभाऊ पाटील यांच्या 71 व्या वाढदिवसानिमित्त अतुलबापू पाटील, श्री. माऊली पाटील व श्री. संदीपदादा ठोंबरे मित्र परिवाराच्यावतीने रविवार दि. 28 ऑगस्ट 2022 रोजी मधुर मिलन मंगल कार्यालयाशेजारी 46 फाटा बैलगाडीसाठी सुप्रसिद्ध असलेले पुणे-पंढरपूर रोडवरील सुप्रसिध्द शुद्ध शाकाहारी असणारे माऊली हॉटेलचे मालक श्री. नितीन मोरे यांच्या भव्य प्रांगणामध्ये बैलगाडा शर्यती नियमानुसार पार पडणार आहेत.

सदर बैलगाडा शर्यतीमध्ये प्रथम क्रमांकाचे पारितोषक 71 हजार रुपये नातेपुते नगरीचे उपनगराध्यक्ष मालोजीराजे तथा आबासाहेब देशमुख व अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती जननायक मामासाहेब पांढरे यांच्या वतीने आहे. द्वितीय क्रमांकाचे 51 हजार रुपये उद्योजक अतुलशेठ बावकर व उद्योजक मोहितशेठ जाधव यांच्या वतीने आहे. तृतीय क्रमांकाचे 41 हजार रुपये उद्योजक संजयअण्णा झगडे व युवा नेते राहुल भैया पांढरे यांच्या वतीने आहे. चतुर्थ क्रमांकाचे 31 हजार रुपयाचे उद्योजक बाळासाहेब नाना पांढरे व कुणाल अर्थमूव्हर्स उद्योजक संतोष शिवाजी पांढरे यांच्यावतीने आहे. पाचवे क्रमांकाचे बक्षीस 21 हजार रुपये नातेपुते ग्रामपंचायतचे माजी सदस्य संदीपदादा ठोंबरे व उद्योजक माऊलीशेठ सरक यांच्यावतीने आहे. सहावा क्रमांकाचे 11 हजार रुपयाचे नातेपुते विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे विद्यमान चेअरमन आजेश बापू पांढरे यांच्या वतीने आहे. सातवे क्रमांकाचे सात हजार रुपये नातेपुते नगरपंचायतीचे नगरसेवक बाळासाहेब नाना काळे यांच्यावतीने आहे. सर्व विजेत्या बैलगाडी मालकांना युवा उद्योजक संतोष आबा वाघमोडे पाटील यांच्यावतीने ट्रॉफी देण्यात येणार आहे. सदर बैलगाडा शर्यतीमध्ये सहभागी होण्याकरिता प्रवेश फी एक हजार एक रुपये आहे.

सदर मैदानाचे समालोचन श्री. सुनील मोरे, पेहगाव हे करणार आहेत. तरी इच्छुक बैलगाडी चालक-मालक यांनी संजय मदने ड्रायव्हर 9890668881, बाळासाहेब मदने 9730520400, शरदअण्णा राऊत 8552942828, अण्णासाहेब पांढरे नगरसेवक 9561651342, रणजीत पांढरे नगरसेवक 9975637378, महेशतात्या बंडगर 7038797007, विठ्ठलतात्या अर्जुन 9890089054, संजय पांढरे 9421070954, प्रवीण बंडगर 9665808028, बापू सरक भांबुर्डी 9766775009, हनुमंत शेंडगे कुस्ती निवेदक 9970361763 या क्रमांकाशी संपर्क साधावा.

सदर बैलगाडा शर्यत सकाळी नऊ वाजता सुरु होणार आहेत. सर्व शासकीय नियम व अटींच्या अधीन राहून बैलगाडा शर्यत संपन्न होणार आहे. तरी बैलगाडी चालक मालक व शौकीन यांनी येऊन आनंद घ्यावा, असे आवाहन नातेपुते नगरपंचायतीचे सभापती अतुल बापू पाटील व माळशिरस पंचायत समितीचे विरोधी पक्ष नेते ज्ञानराज उर्फ माऊली पाटील यांच्यावतीने करण्यात आले आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

Leave a Reply

Back to top button
marsbahis hacklink market casibom