चैतन्य बनसोडे याचा वाढदिवस समाज उपयोगी कार्यक्रमाने संपन्न झाला.
सामाजिक कार्यकर्ते ऋषिकेश बनसोडे यांच्या स्तुत्य उपक्रमाचे शालेय व्यवस्थापन समिती व शाळेच्यावतीने कौतुक…
सदाशिवनगर ( बारामती झटका )
सदाशिवनगर ता. माळशिरस येथील सामाजिक कार्यकर्ते ऋषिकेश बनसोडे यांचे चिरंजीव चैतन्य बनसोडे याच्या वाढदिवसानिमित्त समाज उपयोगी कार्य करून वाढदिवस साजरा करण्यात आला. सदाशिवनगर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, जगताप वस्ती, येथील मुलांना शालेय साहित्य व फळे वाटप करून वाढदिवस साजरा करण्यात आला.


यावेळी जेष्ठ नेते विलास फरतडे, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष बजरंग कत्ते, मुख्याध्यापक ओवाळ सर, कटकधौड सर, अंगणवाडीच्या नष्टे मॅडम, ओव्हाळ मॅडम, आरोग्य सेविका चंदेल मॅडम, ज्येष्ठ पत्रकार विष्णुपंत भोंगळे व सामाजिक कार्यकर्ते ऋषिकेश बनसोडे यांच्यासह शाळेतील विद्यार्थी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


सामाजिक कार्यकर्ते ऋषिकेश बनसोडे यांनी आपल्या मुलाच्या वाढदिवसानिमित्त वायफळ खर्च न करता जिल्हा परिषद शाळेतील लहान मुलांना शालेय साहित्य व फळांचे वाटप करून समाजासमोर वेगळा आदर्श निर्माण केलेला आहे. सामाजिक कार्यकर्ते ऋषिकेश बनसोडे यांच्या या स्तुत्य उपक्रमाचे शालेय व्यवस्थापन समिती व शाळेतील शिक्षक विद्यार्थी यांनी कौतुक केलेले आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

