माळशिरस शहरात गौरी गणपती सण उत्साहात साजरा…
गौरी गणपतीची आकर्षक सजावट व उत्कृष्ट मांडणी करून समाजासमोर आदर्श निर्माण केलेला आहे.
माळशिरस ( बारामती झटका )
माळशिरस नगरपंचायत हद्दीत व माळशिरस शहरात गौरी गणपती सण उत्साहात साजरा करण्यात आला आहे. माळशिरस नगरपंचायतीचे माजी नगरसेवक जनसेवा हॉटेलचे मालक रणजीतशेठ मोटे यांच्या धर्मपत्नी सौ. माधुरी व चिरंजीव प्रदीप यांनी गौरी गणपतीच्या समोर आकर्षक सजावट व उत्कृष्ट मांडणी करून समाजासमोर वेगळा आदर्श निर्माण केलेला आहे.

गेल्या दोन वर्षांमध्ये कोरोना संसर्ग रोगाने शहरी भागासह ग्रामीण भागात थैमान घातलेले होते. अशावेळी सण, उत्सव, यात्रा, जत्रा अशा अनेक कार्यक्रमांवर शासनाने बंदी घातली होती. त्यामुळे गेल्या दोन वर्षात सण उत्सव साजरे करता आले नाहीत. कोरोनाचा प्रादुर्भाव संपलेला असल्याने यंदाच्या वर्षी सर्वच सण उत्सव आनंदाने व मोठ्या उत्साही वातावरणात संपन्न होत आहे. लहानांपासून ते वयोवृद्ध माणसांपर्यंत सर्व गणपती उत्सवामध्ये सहभागी होत असतात.


याच गणेश उत्सवामध्ये महिलांच्या कलागुणांना वाव देणाऱ्या गौरीचे आगमन होत असते. महिला आपल्या घरामध्ये गौरी पूजन करून गौरीची सजावट करून देखावे तयार करीत असतात. पानीव गावची खताळ यांची कन्या व मोटे परिवाराची सून सौ. माधुरी मोटे यांनी गौरी गणपतीच्या समोर आकर्षक, सुटसुटीत व उत्कृष्ट मांडणी करून अनेक महिलांचे लक्ष वेधून घेतलेले आहे. गौरीच्या समोर सजावट करीत असताना आकर्षक मांडणी केलेली आहे. त्यांच्या मांडणीचे महिलांमधून कौतुक केले जात आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng
