तांदुळवाडी येथील छत्रपती संभाजी महाराज गणेश उत्सव मंडळाचा स्तुत्य उपक्रम
तांदुळवाडी ( बारामती झटका )
छत्रपती संभाजी महाराज गणेश उत्सव मंडळ, काळेशिवार तांदुळवाडी यांच्यावतीने स्तुत्य सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. आयोजित करण्यात आलेल्या भव्य रक्तदान शिबीरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या यामध्ये बहात्तर रक्तदात्यांनी स्वयंस्फूर्तीने रक्तदान केले.
रक्तदान शिबिराच्या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. राहुल मिले जिल्हा नियोजन समितीचे माजी सदस्य, श्री. नागेश काकडे तांदुळवाडी गावचे उपसरपंच, श्री. शशिकांत कदम पाटील तांदुळवाडी गावाचे माजी सरपंच, चंद्रकांत लोखंडे ग्रामपंचायत सदस्य, श्री. सतीश (नाना) कदम पाटील तांदुळवाडी विकास सोसायटीचे चेअरमन, श्री. उदय राजगुडे संचालक, श्री. राहुल उघडे व मंडाळाला खंबीर साथ देणारे कैलास काकडे आदी मान्यवरांसह परिसरातील गणेश भाविकभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
छत्रपती संभाजी महाराज श्री गणेश उत्सव मंडळाचे अध्यक्ष रोहित काकडे, सिताराम मिले, निलेश काकडे, बालाजी काकडे, मोहन मिले, रणजित काकडे, वैभव मिले, बाळु मिले, मोहन काकडे, सचिन जाधव, रवी दुधाट, गणेश राजगुडे, शुभम बांदल, माऊली मिले, अंकुश मोरे, रोहित उघडे व मंडळाचे सर्व सदस्य उपस्थित होते.
यावेळी मंडळातील सदस्यांनी सुद्धा रक्तदान करून समाजासमोर वेगळा आदर्श निर्माण केलेला आहे. मंडळाच्या समाज उपयोगी स्तुत्य उपक्रमाचे तांदुळवाडी परीसरातून कौतुक केले जात आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng