ताज्या बातम्याराजकारणसामाजिक

राहून राहून आठवण येते आमदार साहेब तुमच्या विकासकामांची….

फोंडशिरस (बारामती झटका)

भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार तत्कालीन आमदार राम सातपुते यांनी पाच वर्षाच्या कार्यकाळामध्ये अनेक वर्ष पिढ्यानपिढ्या प्रलंबित असणारी विकासकामे केलेली असल्याने माळशिरस तालुक्यातील गोरगरीब सर्वसामान्य व कायम विकासापासून वंचित ठेवलेल्या जनतेमधून आमदार साहेबांच्या विकासकामांची आठवण काढत आहे. राहून राहून आठवण येते, आमदार साहेब तुमच्या विकासकामांची, अशी माळशिरस तालुक्यातील प्रलंबित विकासकामे केलेल्या जनतेमधून सूर निघत आहे.

देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमितजी शहा, राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार तत्कालीन आमदार राम सातपुते यांनी माळशिरस तालुक्यातील 70 वर्ष नव्हे पिढ्यान् पिढ्या कायम विकासापासून कोसो दूर ठेवलेल्या जनतेच्या प्रश्नांची जाण ओळखून तत्कालीन आमदार राम सातपुते यांनी अनेक विकासकामे केलेली आहेत. त्यापैकी नाबार्डमधून ग्रामीण पायाभूत सुविधा विकास निधी अंतर्गत राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँक अर्थसाहित बांगर्डे, फोंडशिरस, सदाशिवनगर, मांडवे, लोणंद, फडतरी, नीटवेवाडी, कुरबावी रस्ता प्रतिमा 114 किमी 14 500 मध्ये पुलाचे काम मे. युनिक बिल्डर्स माळेवाडी अकलूज यांनी काम पूर्ण केलेले आहे.

सदरच्या ठिकाणी पावसाळ्यामध्ये अनेक वेळा शालेय विद्यार्थी व विद्यार्थिनी यांना शाळेत जाता येत नव्हते. वयोवृद्ध, ज्येष्ठ नागरिक, आजारी रुग्ण यांना दवाखान्यात तसेच शेतकरी व दूध व्यवसायिक यांना सुद्धा पावसाळ्यात कमी उंचीचा पुल असल्याने अनेक अडथळे पार करावी लागत होती. सदरची अडचण लक्षात घेऊन तत्कालीन लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांनी जनतेची गरज ओळखून सदरच्या विकास कामासाठी तत्कालीन उपमुख्यमंत्री व सध्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली पुलाचे काम मंजूर करून ठेकेदाराने सध्या पुलाचे काम पूर्ण केलेले आहे.

सदरच्या पुलावरून प्रवास करताना अनेकांच्या चेहऱ्यावर हास्य दिसत आहे. वयोवृद्ध महिला पुलावरून प्रवास करीत असताना त्या महिलेच्या प्रतिक्रिया घेतल्यानंतर आमदार राम सातपुते यांचे कौतुक करून राहून राहून आठवण येते आमदार साहेब तुमच्या विकास कामांची, असे सांगून आमदार साहेब यांचा जरी निसटचा पराभव झाला असला तरी भविष्याचा काळ त्यांचाच असणार आहे, असा विश्वास व्यक्त करून हसत हसत पुलावरून फंडशिरसच्या दिशेने रवाना झालेल्या होत्या.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

Back to top button