आ. राम सातपुते यांना उगाच निवडून आणलयं, म्हणणाऱ्या टोळीच्या मुकादमाला मोबदला दिलायं, अशी भाजपच्या बुद्रुक गटात चर्चा सुरू…
भारतीय जनता पक्षाने पुनश्च उमेदवारी पाणीदार खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना दिल्यानंतर लोकप्रतिनिधींच्या टेंभुर्णी येथील बैठकीनंतर टोळीचा तोल सुटला, बोंबमारी सुरू झाली…
माळशिरस (बारामती झटका)
भारतीय जनता पक्ष व महायुतीचे अधिकृत उमेदवार म्हणून माढा लोकसभेचे कार्यतत्पर व पाणीदार खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर माढा लोकसभा मतदारसंघातील महायुतीची बैठक टेंभुर्णी येथील आमदार संजयमामा शिंदे यांच्या फार्महाऊसवरती खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी आयोजित केलेली होती. सदरच्या बैठकीस माढा विधानसभेचे आमदार बबनदादा शिंदे, सांगोला विधानसभेचे आमदार शहाजीबापू पाटील, माण खटावचे आमदार जयकुमार गोरे, करमाळा विधानसभेचे आमदार संजयमामा शिंदे, माळशिरसचे आमदार राम सातपुते, माजी आमदार दीपकआबा साळुंखे पाटील, माजी आमदार डॉ. दिलीप येळगावकर, लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे विविध पक्षांचे पदाधिकारी, जिल्हा परिषद, खरेदी विक्री संघ, कृषी उत्पन्न बाजार समिती, साखर कारखाने, पंचायत समिती व विविध पदावर काम केलेले लोकप्रतिनिधी यांची संयुक्त बैठक झाली.
सदरच्या बैठकीनंतर माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांनी रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांच्या बैठकीस हजेरी लावल्यानंतर राजकीय टोळीचा तोल सुटून बोंबमारी सुरू झाली. सोशल मीडियावर उलट सुलट चर्चा सुरू झाल्यानंतर भारतीय जनता पक्षाच्या निष्ठावान व बुद्रुक गटात आमदार राम सातपुते यांचे समर्थन करून आमदार राम सातपुते यांना उगाचच निवडून आणले, चुक केली, अशा वल्गना करणाऱ्या टोळींना भाजपच्या निष्ठावान गटातून सांगणे आहे. टोळीच्या मुकादमाला मोबदला दिलेला आहे आपण मुकादामाच्या नावाने बोंब मारावी, अशी खुमासदार चर्चा सुरू आहे.
भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांनी माढा लोकसभेच्या उमेदवारीसाठी रस्सीखेच सुरू असताना कोणाचे समर्थन केलेले नव्हते. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी, राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, केंद्रीय गृहमंत्री अमितजी शहा, राज्याचे कर्तव्यदक्ष उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडवणीस, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे यांच्यासह केंद्रीय व राज्यातील निवड समितीने भारतीय जनता पक्षाचे व महायुतीचे उमेदवार म्हणून पाणीदार खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची पुनश्च उमेदवारी घोषित केल्यानंतर भारतीय जनता पक्ष व कमळ चिन्हावर प्रेम असणारे लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांनी बैठकीस हजेरी लावणे गैर काय आहे, असा निष्ठावान भाजपचा कार्यकर्ता व आमदार राम सातपुते यांच्या समर्थकांमधून सवाल उपस्थित केला जात आहे.
भारतीय जनता पक्षाने आमदार राम सातपुते यांना आमदार केलेले आहे. भारतीय जनता पक्षाशी व भाजपच्या नेत्यांच्या विचारांसोबत राहणारे आमदार राम सातपुते निष्ठावान कार्यकर्ते आहेत. राजकीय टोळीने आमदार राम सातपुते यांचे मुकादमाच्या आदेशावरून काम केलेले होते. भारतीय जनता पक्षाने टोळीच्या मुकादमचा मोबदला दिलेला असल्याने आमदार राम सातपुते यांच्यावरील चिखल फेक थांबवा, अन्यथा जशास तसे उत्तर देण्यास भारतीय जनता पक्षाचे निष्ठावान व भाजपचे बुद्रुक सदस्य कायम तयार असतील, असा सूर भाजपच्या कार्यकर्त्यांमधून व आमदार राम सातपुते समर्थक यांच्यामधून निघत आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.
Üsküdar Gider Açma Üsküdar de hizmet veren bir acil vidanjör ve tıkanıklık açma firmasıdır. Firmamızın ana faaliyeti kanalizasyon, yağmur suyu gibi pek çok hizmet sunmaktayız https://serioustech.co.uk/2024/03/18/uskudar-su-kacak-tespiti/