Uncategorized

सातारा व सोलापूर या जिल्ह्यांना जोडणारा इजभाव ते भांब घाट पूर्ण होणार – बाळासाहेब सरगर

माळशिरस ( बारामती झटका)

सोलापूर-सातारा या दोन जिल्ह्यांना जोडणारा, दळणवळणाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा असणारा हा घाट पूर्ण होणे गरजेचे होते. त्यासाठी माळशिरस तालुक्याचे आमदार रामभाऊ सातपुते यांच्या माध्यमातून खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व मान खटावचे आमदार जयकुमार गोरे यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करून हा रस्ता होण्यासाठी प्रयत्न केले होते.

पंढरपूर या ठिकाणी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची सभा होती, त्या वेळेला आ‌ जयकुमार गोरे व आ. रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांच्या समवेत बैठक लावून हा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले होते. त्यानंतर माढा लोकसभेचे खासदार नाईक निंबाळकर यांनी भांब, गिरवी, कण्हेर, रेडे या भागाचा दौरा केला होता. त्यावेळी आमचे सरपंच पोपट सरगर, कण्हेरचे सरपंच पोपट माने, रेडेचे सरपंच आप्पासाहेब शेंडगे, युवा नेते तुकाराम गोपने सर यांनी त्यांना निवेदन दिले होते‌.

नुकतेच राज्यामध्ये नवीन सरकार अस्तित्वात आल्यानंतर आल्यानंतर मान तालुक्यासाठी 52 कोटी 90 लाखाचा विशेष निधी मंजूर केला‌ त्यामध्ये 1.50 कोटी रुपयाचा निधी या घाटासाठी मंजूर केल्याने हा घाटाचा प्रश्न तात्काळ मार्गी लागणार आहे. त्यामुळे माळशिरस व मान तालुक्यातील या प्रश्नासाठी आ. जयकुमार गोरे निधी टाकल्याने दळणवळणाची सोय झाली आहे. भाजप शिवसेनेचे सरकार सत्तेत आल्याने गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला प्रश्न मार्गी लागल्याने माळशिरस तालुक्यातील जनतेने आमदार जयकुमार गोरे व आमदार राम सातपुते यांचे विशेष आभार मानले आहे. या कामी बाळासाहेब सरगर यांनी सातत्याने पाठपुरावा केल्याचे यश आल्याचे सर्वसामान्य जनतेमध्ये आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

Leave a Reply

Back to top button