आदर्श शाळेचे उत्तम उदाहरण म्हणजे रत्नत्रय – विठ्ठल काळे.
मांडवे (बारामती झटका)
सर्वप्रथम भारत मातेला वंदन करुन कार्यक्रमाची सुरुवात झाली. दि. 15 ऑगस्ट भारत देशाला स्वतंत्र होऊन 77 वर्ष पूर्ण झाली. इंग्रजांच्या सुमारे दीडशे वर्षाच्या गुलामगिरीतून मुक्त झालेला भारत स्वातंत्र्याचा उच्छवास घेत आहे. स्वातंत्र्य दिन रत्नत्रय इंग्लिश मीडियम स्कूल विद्यालय, ज्यु. कॉलेज, मांडवे येथे सर्वांनी गौरवाने साजरा केला. स्वातंत्र्याच्या उत्साहाने व देशभक्तीच्या चैतन्याने उगवलेल्या या मंगलप्रभाती, माननीय व्यासपीठ व प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते ध्वजारोहण करून ध्वज अभिमानाने फडकवल्यानंतर राष्ट्रगीत, ध्वजगीत व महाराष्ट्र गीताच्या गायनाने संपूर्ण वातावरण देशभक्तीमय झाले व कार्यक्रमाची मंगलमय सुरुवात झाली. तदनंतर विद्यार्थ्यांनी नेत्रदीपक संचलन केले व शारीरिक कवायतीची अद्भुत प्रस्तुती करून सर्वांची मने जिंकून घेतली. त्यानंतर मान्यवरांचे सत्कार करण्यात आले. त्यानंतर इयत्ता पहिली, दुसरी, तिसरी इयत्तेतील इंग्रजी व सेमी माध्यमाच्या विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र टॅलेंट सर्च परीक्षा 2023-24 मध्ये जिल्हास्तर व केंद्रस्तर अशा एकूण 17 विद्यार्थ्यांनी उत्तुंग यश संपादन केले.
अनिका संदीप शहा, पियूष सचिन वाघमोडे, सार्थक अजिनाथ वाघमोडे, स्वरा किरण शिंदे, विराज लक्ष्मण तांबे, समिधा ज्ञानेश्वर भोसले, तन्वी विकी सोनवणे, संस्कृती सुनील सालगुडे, आरुष दिपक वाघमोडे, अथर्व प्रमोद निंबाळकर, समृद्धी विनोद शिंदे, शुभम गजानन फाळके, आयत जब्बार इनामदार, श्रेया राहुल पालवे, स्वरा वैभव मोडासे, संस्कृती गणेश जगताप, उमर सरफराज शेख
या विद्यार्थ्यांनी स्वतःबरोबरच शाळेचे नाव मोठे करून नेत्रदीपक असे यश संपादन केले. त्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते ट्रॉफी व प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. तसेच त्यांच्या मार्गदर्शक शिक्षकांचाही सत्कार करण्यात आला.
तसेच तालुकास्तरीय योगासन स्पर्धा 2024 -25 मध्ये शिवतेज राजकुमार फाळके प्रथम व वैष्णवी पांडुरंग सुतार या दोन्ही विद्यार्थ्यांची जिल्हास्तरासाठी निवड झाली म्हणून या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. तदनंतर विद्यार्थ्यांनी मातृभूमीच्या स्वातंत्र्याविषयी ज्या लोकांनी आपल्या प्राणांची बाजी लावली, स्वातंत्र्यवीरांनी बलिदान केले, त्यांच्या विषयीच्या आठवणी आपल्या मनोगतातून व्यक्त केल्या. स्वातंत्र्य मिळवण्यासाठी असंख्य हुतात्म्यांनी आहुती दिली. अनेक क्रांतिकारक शहीद झाले, तेव्हा भारतीयांना स्वातंत्र्याचा प्रकाश दिसू शकला. या राष्ट्रीय पर्वाच्या निमित्ताने 5, 6, 7 व 10 इंग्रजी माध्यम व 3, 4, 5 सेमी आणि 11 सायन्सच्या विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रमाची प्रस्तुती करून देशभक्तांच्या विषयीच्या अभिमानाच्या भावना नृत्यातून सादर केल्या.
अक्षरशः अंगावर शहारे आणणारा भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांच्या फाशीचा क्षण इयत्ता पाचवी व सहावी इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्यांनी हुबेहूब सादर केला.
यानंतर संस्थेचे सचिव माननीय श्री. प्रमोद दोशी यांनी आपल्या मनोगतातून संपूर्ण कार्यक्रमाच्या रूपरेषेचा आढावा घेतला.
त्यानंतर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री. विठ्ठल महादेव काळे गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर पुणे यांनी त्यांच्या अनुभवाच्या व ज्ञानाच्या कुंभातील स्वातंत्र्यवीरांविषयी काही मौलिक विचार मांडले विद्यार्थ्यांसाठी अनमोल व प्रेरक विचार आपल्या मनोगतातून मांडले. विविध स्पर्धेमध्ये यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांबद्दल बोलताना आदर्श शाळेचे उत्तम उदाहरण म्हणजे रत्नत्रय. जिथे दर्जेदार शिक्षणासह कलागुणांना वाव दिला जातो. या शब्दात कौतुक केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी मार्गदर्शक सूचना केल्या. यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष व संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री. अनंतलाल दादा दोशी यांनी देशप्रेम कसे असावे. विद्यार्थी व शिक्षक यांच्यातील नाते कसे असावे, मौलिक विचार आपल्या भाषणातून व्यक्त केले.
सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देऊन स्पर्धेत यश मिळालेल्या विद्यार्थ्यांचे कौतुक करुन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. सर्व मान्यवरांचे आभार व्यक्त करून वंदे मातरम् गायनाने कार्यक्रमाची सांगता झाली. त्यानंतर माननीय रवींद्र कुलकर्णी, संचालक रत्नत्रय स्कूल, मांडवे यांच्याकडून विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले. या स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमासाठी श्री. विठ्ठल काळे गव्हर्मेंट कॉन्ट्रॅक्टर पुणे, श्री. अनंतलाल दोशी संस्थापक अध्यक्ष रत्नत्रय परिवार, प्रमोद दोशी सचिव रत्नत्रय स्कूल, अभिजीत दोशी, रवींद्र कुलकर्णी, सुरेश धाईंजे, बबन गोफणे, तनोज शहा, अजय गांधी, चंद्रकांत तोरणे, दत्तात्रय भोसले, शंकर वाघमोडे, महादेव सपकाळ, अभिजीत गुरव, सुरज दोशी, वैभव शहा, शंकर बनकर, दिपक वाघमोडे, महादेव पालवे, मृणालिनी दोशी, भाग्यश्री दोशी, पुनम दोशी, पार्वती जाधव, सुरज दोशी, वैभव मोडासे, ज्ञानेश्वर राऊत, नितीन काळे,
मुख्याध्यापक दैवत वाघमोडे सर, पालक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे स्वागत, प्रास्ताविक वाघमोडे सर तर सूत्रसंचालन व आभार वनिता निंबाळकर मॅडम यांनी केले.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.
Hi i think that i saw you visited my web site thus i came to Return the favore Im attempting to find things to enhance my siteI suppose its ok to use a few of your ideas