“आमचं ठरलंय”, “निर्णय झालाय” माढा, सोलापूर, बारामती, सातारा भाजपला घालवायचं – जयसिंह मोहिते पाटील उर्फ बाळदादा.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कमळ चिन्हाला थेट आव्हान, आजी व वडील पंतप्रधान असणाऱ्या राहुल गांधी यांना जमलं नाही, मोहिते पाटील “किस पेड की पत्ती”, अशी भारतीय जनता पक्षात चर्चा सुरू आहे..
अकलूज (बारामती झटका )
माढा लोकसभा मतदार संघाचे कार्यतत्पर व पाणीदार खासदार रणजितसिंह हिंदुराव नाईक निंबाळकर यांना भाजप महायुतीचे उमेदवार म्हणून पुनश्च माढा लोकसभा मतदारसंघात उमेदवारी दिलेली आहे. माढा लोकसभेसाठी इच्छुक असलेले धैर्यशील मोहिते पाटील यांना डावलेले असल्याने शिवरत्न बंगला येथे महाराष्ट्र राज्याचे कर्तव्यदक्ष उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडवणीस यांचे विश्वासू सहकारी व भाजपचे संकटमोचन गिरीशजी महाजन यांचा दौरा होता. त्यावेळेस प्रसार माध्यमांशी बोलत असताना मोहिते पाटील परिवारातील किंगमेकर सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान चेअरमन माळशिरस तालुक्याचे ज्येष्ठ नेते जयसिंह शंकरराव मोहिते पाटील उर्फ बाळ दादा यांनी जाहीरपणे बोलताना सांगितले. “आमचं ठरलंय, निर्णय झालाय, माढा, सोलापूर, बारामती, सातारा भाजपला घालवायचंय”, असे म्हणून देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या कमळ चिन्हाला थेट आव्हान देत भाजपला विरोध केलेला आहे. बाळदादांचा निर्णय हा मोहिते पाटील परिवारांचा निर्णय असतो, असा आजपर्यंतचा इतिहास आहे. देशामध्ये स्वर्गीय इंदिराजी गांधी, स्वर्गीय राजीवजी गांधी यांचे राजकीय वलय व पंतप्रधान पदावर असणाऱ्या घराण्यातील राहुल गांधी यांना पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांना रोखने जमत नाही, ते शक्य होत नाही. मोहिते पाटील किस पेड की पत्ती, अशी भारतीय जनता पक्षात चर्चा सुरू झालेली आहे.
माळशिरस तालुक्याचे भाग्यविधाते सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विकासरत्न विजयसिंह मोहिते पाटील यांनी माळशिरस तालुक्यात राजकारण केले. माळशिरस तालुक्यात सुद्धा सहकार महर्षी यांचा पराभव झालेला होता तर तालुक्याच्या बाहेर मंगळवेढा, पंढरपूर विधानसभा मतदार संघात विजयसिंह मोहिते पाटील यांचा पराभव झालेला होता. मोहिते पाटील परिवारातील महाराष्ट्र राज्याचे माजी सहकार राज्यमंत्री लोकनेते स्वर्गीय प्रतापसिंह मोहिते पाटील एकमेव नेते आहेत जे तालुक्याच्या बाहेर जाऊन सोलापूर लोकसभा मतदारसंघात निवडून आलेले आहेत, असा मोहिते पाटील यांचा राजकीय इतिहास आहे. मोहिते पाटील परिवारातील सदस्यांनी भारतीय जनता पक्षामध्ये गत निवडणुकीपूर्वी प्रवेश केलेला होता. मोहिते पाटील यांच्या राजकीय ताकतीचा अंदाज भाजपच्या नेत्यांना विधानसभेच्या निवडणुकीत आलेला होता.
सध्या माढा, सोलापूर, बारामती, सातारा या मतदारसंघातून भाजपला घालवायचं, असे म्हणणारे जयसिंह मोहिते पाटील उर्फ बाळदादा अकलूज ग्रामपंचायत निवडणुकीत स्वतःच्या मुलाला निवडून आणू शकलेले नव्हते, हा इतिहास आहे. मोहिते पाटील यांची राजकीय ताकद असेल तर माढा लोकसभा मतदारसंघात उभे राहून ताकतीचा अंदाज घ्यावा, अशी भारतीय जनता पक्षाच्या कमळ चिन्हावर प्रेम असणाऱ्या तमाम कार्यकर्ते व नेते यांची अपेक्षा आहे. मोहिते पाटील यांनी चार मतदार संघातील उमेदवारांना विरोध केला नाही तर थेट पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्याशी पंगा घेतलेला आहे. त्यामुळे भविष्यामध्ये भारतीय जनता पक्षाची भूमिका निर्णायक ठरणार असून येणारा काळच ठरवणार आहे, भाजपच्या गोटातून वेट अँड वॉच असे बोलले जाते.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.