आमच्याही अगोदर जनतेनेच ही निवडणूक हाती घेतली होती – राष्ट्रवादीचे नेते उत्तमराव जानकर
उत्तमराव जानकर यांची मोहिते पाटील यांच्याशी केलेली हातमिळवणी म्हणजे अभद्र युती – के. के. पाटील, माळशिरस तालुका निवडणूक प्रमुख
अकलूज (बारामती झटका)
माळशिरस तालुक्यातील मोहिते पाटील यांचे दोन प्रमुख राजकीय विरोधक असणारे उत्तमराव जानकर व के. के. पाटील. यापैकी उत्तमराव जानकर यांनी मोहिते पाटील यांच्याशी हातमिळवणी केल्याने तालुक्यातील राजकीय गणिते बदलली. त्यानंतर झालेल्या लोकसभा निवडणुकीत के. के. पाटील महायुतीकडून तर उत्तमराव जानकर महाविकास आघाडीकडून आपापल्या उमेदवारांसाठी लढले. दोघांनीही या निवडणुक प्रचारात प्रमुखांच्या भूमिका बजावल्या आहेत, त्याचे परिणाम येत्या ८ दिवसात म्हणजे ४ जून रोजी दिसणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर या दोघांशी वेगवेगळा संवाद साधला असता,दोघांनी आपापल्या उमेदवारांच्या विजयाचे व मताधिक्याचे दावे केले.
उत्तमराव जानकर म्हणतात, या निवडणुकीत सगळे नेते भाजपबरोबर असले तरी जनता आमच्याबरोबर राहिली. भाजपचे ईडी, सीबीआय, पक्ष फोडाफोडी, पक्षच चोरी हे मुद्दे सर्वसामान्यांना आवडले नाहीत. महागाई, शेतकऱ्यांच्या प्रश्नावरील शासनाचे मौन, आरक्षणाबाबत मराठा, धनगर आदी प्रमुख समाजाची फसवणूक आदी मुद्दे घेऊन आम्ही जनतेसमोर गेलो असलो तरी आमच्याही अगोदर जनतेनेच ही निवडणूक हाती घेतली होती. त्यामुळे आमचा धैर्यशील मोहिते पाटील यांचा २ लाखांच्या मताधिक्याने विजय होईल. याचे विश्लेषण सांगताना ते म्हणाले की, विद्यमान खासदारांनी गेल्या ५ वर्षात मताधिक्य मिळूनही लोकांना न भेटणे, त्यांचे फोन न उचलणे, त्यांचा अपमान करणे, त्यांची कोणतीही कामे न करणे असे वर्तन केल्याने यावेळी फलटणमधून आघाडी उमेदवाराला १५ हजारांचे मताधिक्य मिळेल. तसेच स्थानिक उमेदवार, भाजपवरील रोष यामुळे माळशिरस मधून १ लाख १६ हजारांचे मताधिक्य मिळेल. माण, सांगोल्यातून प्रत्येकी १० हजार, तर माढयातून ३० हजार व करमाळयातून १५ हजाराचे मताधिक्य धैर्यशील मोहिते पाटील यांना मिळेल.
या निवडणुकीबाबत भाजपचे ज्येष्ठ कार्यकर्ते के. के. पाटील हे ही आपल्या उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या मताधिक्यासह विजयाचा दावा करत आहेत. त्याबाबत बोलताना ते म्हणतात की, मोदींमुळे देशाची जगभरात प्रतिमा उंचावली आहे. शिवाय राज्यातील व केंद्रातील सरकारांनी समाजातील सर्व घटकांसाठी काम केले आहे. व तेच या राज्याचा व देशाचा विकास करू शकतात, हे मुद्दे घेऊन आम्ही जनतेसमोर गेलो. जनतेने ते स्वीकारून आम्हाला भरघोस मतदान केले आहे. याचे विश्लेषण करताना ते माळशिरसमधून आम्हाला ८० हजार मते मिळतील. मात्र, आम्ही त्याठिकाणी सुमारे ५० हजारांच्या फरकाने मागे राहू. माढयात ५ हजारांच्या फरकाने कमी जास्त होतील, पण आम्हाला फलटणमधून ३५ ते ४० हजार, माण खटावमधून २५ ते ३० हजार, सांगोल्यातून १५ ते २० हजार, करमाळयात १० ते १५ हजार मतांचे मताधिक्य मिळेल. त्यामुळे त्यांना माळशिरस मधून मिळालेले मताधिक्य वजा करून सुमारे ४० हजारांच्या फरकाने विजयी होऊ. उत्तमराव जानकर यांच्या मोहिते पाटील यांच्याशी केलेल्या हातमिळवणीने महायुतीचे कोणतेही नुकसान झालेले नाही. त्यांनी केलेली युती ही अभद्र युती असून ती लोकांना आवडली नाही, याचा आम्हाला फायदाच होईल.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.
child teen
porn
porn
This was a fantastic read. The analysis was spot-on. Interested in more? Check out my profile for more engaging discussions!