आमंत्रण आणि निमंत्रणमध्ये काय फरक ? कधी काय वापरावं, माहिती आहे का ?
(बारामती झटका)
अनेकदा लोकांचा गोंधळ उडतो की, आमंत्रण आणि निमंत्रण यादोन्ही पैकी काय बरोबर आहे. काही लोक तर दोघांचाही एकच अर्थ समजून केव्हाही कोणताही शब्द वापरतात. पण असं नाही. दोन्ही शब्दांचा वेगवेगळा अर्थ आहे आणि त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी वापरतात.
आग्रहाचे आमंत्रण किंवा निमंत्रण असलेली कार्यक्रमाची पत्रीका एकदा तरी नक्कीच मिळाली असेल. याला इंग्रजीत बोलायचं झालं तर Invitaion Card असं म्हणतो. इंग्रजीत जरी याला एकाच शब्दानं ओळखत असलो तरी मराठीत मात्र आमंत्रण किंवा निमंत्रण असे दोन शब्द आहेत.
जेव्हा एखाद्या नियोजित कार्यक्रमात कोणी आलं किंवा नाही आलं तरी चालतं, तुमच्या अनुपस्थीतीत हा कार्यक्रम पार पडणार असतो अशावेळी या कार्यक्रमाबद्दल फक्त सूचित करायचे असते तेव्हा मुख्यतः आमंत्रण हा शब्द वापरला जातो.
पण जेव्हा ठराविक व्यक्तीच्या उपस्थीतिथीशिवाय एखादा कार्यक्रम पार पडू शकत नाही, आणि हे जेव्हा सूचीत करायचे असते तेव्हा निमंत्रण हा शब्द वापरला जातो.
याचाच अर्थ आग्रहाने कोणाला आपण बोलावतो आणि ती व्यक्ती आपल्यासाठी महत्वाची असते तेव्हा त्याला आपण निमंत्रण द्यायला हवे. पण एखाद्या व्यक्तीला कार्यक्रमाबद्दल सांगण्यासाठी तुम्ही आमंत्रण देऊ शकता. मराठी भाषेत असे असंख्य शब्द असतील जे आपल्याला गोंधळात टाकतील. पण हीच खरी भाषेतील गंमत आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.
AMAZING POSTT..!! CANT WAIT YOU NEXT POST.! Its goooddddddd
AMAZING POST BRO.!! WE WAIT YOUR NEW POST AHA AHA EHE EHE…!!!