आंबी खुर्द-पांडेश्वर शिवरस्ता प्रशासनाने केला खुला
बारामती (बारामती झटका)
तहसीलदार गणेश शिंदे यांच्या आदेशाने महसूल व पोलीस प्रशासनाने संयुक्तरित्या कारवाई करत आंबी खुर्द येथील गट क्र. ९८ व पुरंदर तालुक्यातील पांडेश्वर गावाच्या हद्दीवरील शिवरस्ता खुला करण्यात आला आहे.
यावेळी मोरगावच्या मंडळ अधिकारी प्रमिला लोखंडे, पोलीस हवालदार राहुल भाग्यवंत, पोलीस नाईक दिपाली मोहिते, पोलीस शिपाई आदेश मावळे व भाऊ चौधरी, आंबी खुर्दचे पोलीस पाटील अशोक रायकर, ग्रामस्थ रघुनाथ कुतवळ, जयराम शिंदे आदी उपस्थित होते.
हा शिवरस्ता बारामती तालुक्यातील आंबी खुर्द आणि पुरंदर तालुक्यातील पांडेश्वर या गावादरम्यानचा अर्थात दोन तालुक्यादरम्यानचा आहे. हा शिवरस्ता खुला करण्याबाबत आंबी खु. येथील शेतकरी रघुनाथ कुतवळ यांनी तहसील कार्यालयास पत्रान्वये विनंती केली होती. तहसील कार्यालयाने पोलीस प्रशासनाच्या मदतीने आवश्यक त्या सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्या आणि अर्जदार श्री. कुतवळ व प्रतिवादी श्री. शिंदे यांच्यामध्ये तडजोड घडवून आणून हा रस्ता खुला केला. या रस्त्याचा आंबी खूर्द व पांडेश्वर येथील शेतकऱ्यांना लाभ होणार आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.