आमदार बबनदादा यांनी निधी मंजूर केलेल्या कामाचं उद्घाटन रणजीतदादा करून मोकळ्यात श्रेय घेत आहेत…

महाळुंग (बारामती झटका)
माढा विधानसभेचे पाणीदार षटकार आमदार बबनदादा शिंदे यांनी निधी मंजूर केलेल्या माढा विधानसभा मतदारसंघातील माळशिरस तालुक्यातील गावांच्या कामाचे विधान परिषदेचे आमदार रणजीतसिंह मोहिते पाटील उद्घाटन करून केविलवाणी श्रेय घेण्याचा प्रयत्न करीत असल्याची चर्चा श्रीपुर व उंबरे वेळापूर परिसरामध्ये सुरू आहे.
हकीगत अशी आहे, उंबरे (वे.) ता. माळशिरस मध्ये उंबरे (वे.) ते श्रीपूर जिल्हा मार्ग क्र. 118 ला मिळणारा रस्ता प्रजिमा 189 कि.मी. मध्ये संपूर्ण अंतर 3 की.मी. आहे. त्यामध्ये विद्यमान आमदार बबनदादा शिंदे यांनी त्यांच्या चालू वर्षी बजेट मधून 3 कोटी रुपये मंजूर केले. हा रस्ता माघील 15-20 वर्षांपासून खराब झालेला होता. यासाठी वेळोवेळी पाठपुरावा करून पैसे मंजूर करून घेतले आणि त्या 3 कोटीमध्ये 1200 ते 1300 मीटर अंतरचे इस्टीमेट केले आणि राहिलेले अंतर PWD बांधकाम विभाग यांचेकडून त्यांच्या विभागामार्फत विद्यमान आमदार बबनदादा शिंदे यांचे शिफारास पत्र जोडून मंजूर करून घेतले.

मात्र, नेहमीप्रमाणे काही नेत्यांनी या कामाचे उदघाटन आमदार साहेब बबनदादा आणि भावी आमदार रणजितभैय्या साहेब 2-3 दिवसात करणार होते. म्हणून या कामाचे श्रेय आमदार बबनदादांना जाता कामा नये मनून PWD बांधकाम विभाग मधील शासकीय अधिकारी हाताला धरून या कामाचे उदघाटन तात्काळ करायचं म्हणून 11 तारीखेचं नियोजन केलं आणि सगळ्या सोशलमीडिया वरती निमंत्रण पत्रिका पण पाठवली. पण, गंमत अशी झाली आहे की, यांनी हा कार्यक्रम ज्यांनी या रस्त्यासाठी निधी मंजूर केला त्याचं पण नाव न टाकता अथवा त्यांना विश्वासात न घेता एक मा. सरपंच आणि एक मा. सभापती यांची नावे शासकीय प्रोटोकॉल तोडून महाराष्ट्र शासन या बोर्डवरती टाकलेली आहे.
या सर्व बाबींचा आम्ही निषेध करतो, तसेच यांना सहकार्य, मनमानी करणाऱ्या शासकीय अधिकारी PWD बांधकाम विभाग अकलूज यांचा पण आम्ही निषेध करतो. पुढे येणाऱ्या सर्व अडचणींना बांधकाम विभाग अकलूज जबाबदार राहील, असे आमदार बबनदादा शिंदे समर्थक यांच्यामधून बोलले जात आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.