ताज्या बातम्या

आमदार मातोश्री स्वर्गीय सौ. जिजाबाई विठ्ठल सातपुते यांचे प्रथम पुण्यस्मरण डोईठाण येथे संपन्न होत आहे.

सुप्रसिद्ध कीर्तनकार ह. भ. प. प्रकाश महाराज साठे यांचे सुश्राव्य कीर्तन, पुष्पवृष्टी, आरती व महाप्रसादाचे आयोजन…

माळशिरस (बारामती झटका)

सौ. जिजाबाई विठ्ठल सातपुते यांचे वयाच्या ७४ व्या वर्षी अल्पशा आजाराने सोमवार दि. २६ जून २०२३ रोजी सायंकाळी दुःखद निधन झालेले होते. त्यांच्या पश्चात पती, एक मुलगा, तीन मुली, सुन, नातवंडे असा परिवार आहे. भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय आमदार राम सातपुते यांच्या त्या मातोश्री होत्या. स्वर्गीय सौ. जिजाबाई विठ्ठल सातपुते यांचे प्रथम पुण्यस्मरण रविवार दि. 14 जुलै 2024 रोजी डोईठाण, ता. आष्टी, जि. बीड, येथे होत असून प्रथम पुण्यस्मरणानिमित्त सुप्रसिद्ध कीर्तनकार ह. भ. प. प्रकाश महाराज साठे यांचे सकाळी नऊ ते अकरा या वेळेत सुश्राव्य कीर्तन होणार आहे. कीर्तनानंतर पुष्पवृष्टी, आरती व महाप्रसादाचे आयोजन केलेले आहे. तरी, मित्रपरिवार व नातेवाईक यांनी उपस्थित रहावे, असे श्री‌ विठ्ठल गणपत सातपुते, श्री‌. बाळासाहेब नामदेव सातपुते, श्री‌. रमेश नामदेव सातपुते, श्री. आ. राम विठ्ठल सातपुते यांच्यावतीने उपस्थित राहण्याचे नम्र आवाहन करण्यात आलेले आहे.

सौ. जिजाबाई व विठ्ठल सातपुते यांनी प्रतिकूल परिस्थितीत संसार करून आपल्या मुलांना चांगले संस्कार व उच्च शिक्षण दिलेले आहे. माळशिरस तालुक्यामध्ये अनेक वर्ष ऊसतोड कामगार म्हणून त्यांनी काम केलेले आहे. त्यांचा मुलगा राम सातपुते यांना माळशिरस तालुक्याचे आमदार होण्याचे भाग्य लाभलेले आहे. दोन-तीन महिन्यापासून दवाखान्यांमध्ये सौ. जिजाबाई यांच्यावर औषध उपचार सुरू होते. माळशिरस तालुक्यामध्ये श्री संत ज्ञानेश्वर महाराज व श्री संत तुकाराम महाराज यांच्या पालखींचे आगमन होऊन पालखी तालुक्याच्या सरहद्दीवरून पंढरपूरकडे जात असताना सौ. जिजाबाई विठ्ठल सातपुते यांनी जगाचा अखेरचा निरोप घेतलेला होता.

स्व. सौ. जिजाबाई यांना सौभाग्य मरण आलेले आहे. त्यांच्यावर डोईठाण, ता. आष्टी, जि. बीड येथे मंगळवार दि. २७ जून २०२३ रोजी सकाळी ०९ वाजता अंतिम संस्कार करण्यात आलेले होते.

भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय आमदार राम सातपुते यांनी माळशिरस तालुक्याचे लोकप्रतिनिधी झाल्यानंतर मतदार संघातील जनतेची सेवा करण्याकरिता माळशिरस तालुक्यातील मांडवे येथील ५० फाटा या ठिकाणी स्वकर्तृत्वातून उभारलेल्या श्रीराम या घरामध्ये मातोश्री स्वर्गीय सौ. जिजाबाई विठ्ठल सातपुते यांनी वयाच्या ७४ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतलेला आहे. आई-वडिलांनी ऊसतोड मजूर म्हणून ज्या परिसरात काम केले, त्याच परिसरात चांगल्या संस्कारातून घडलेल्या मुलाने स्वकर्तुत्वातून उभारलेल्या घरामध्ये सौभाग्य मृत्यू आल्याचे भाग्य मातोश्री जिजाबाई यांना मिळालेले आहे.

स्वर्गीय जिजाबाई यांना सौभाग्य मरण आलेले होते. त्यांच्या गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ असल्याने हरिनामाच्या जयघोषामध्ये अंत्ययात्रा स्वर्ग रथातून निघालेली होती. अंत्ययात्रेच्या वाटेने पुष्प व हळदी कुंकवाचा सडा टाकण्यात आलेला होता. वारकऱ्यांनी हरिनामाच्या जयघोषामध्ये अंत्ययात्रेला सुरुवात केलेली होती. स्वर्गरथामध्ये पार्थिव देह ठेवून शेतामध्ये दहन देण्याचा कार्यक्रम झालेला होता. सौ. जिजाबाई यांचे भाग्य मोठे आहे. आमदार झालेल्या पुत्राने मुखाग्नी दिलेला आहे. यावेळी भारतीय जनता पक्षाचे विधान परिषदेचे आमदार श्रीकांतजी भारतीय, विधान परिषदेचे आमदार सुरेश धस, आष्टीचे आमदार बाळासाहेब आसबे यांच्यासह आष्टी तालुका व बीड जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आमदार राम सातपुते यांनी माळशिरस तालुक्याचे प्रतिनिधित्व चांगल्या प्रकारे केलेले असल्याने सर्वसामान्य जनतेतून मातृप्रेमाला मुकलेले असल्याने हळहळ व्यक्त केली जात होती. खासकरून माळशिरस तालुक्यातून जिल्हा परिषद व पंचायत समितीचे आजी-माजी सदस्य, नातेपुते नगरपंचायतचे पदाधिकारी व नगरसेवक, माळशिरस नगरपंचायतीचे आजी-माजी पदाधिकारी व नगरसेवक, भारतीय जनता पक्षाचे प्रदेश, जिल्हा व तालुका पदाधिकारी यांच्यासह स्वाभिमानी शेतकरी संघटना, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शिवसेना, आरपीआय पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते. माळशिरस तालुक्यातील आजी माजी सरपंच, उपसरपंच, सदस्य, दूध संस्था, मजूर संस्था, सेवा सोसायटीचे चेअरमन, व्हाईस चेअरमन, संचालक मंडळ यांच्यासह सर्वसामान्य नागरिक, शेतकरी व तरुण वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आमदार राम सातपुते यांनी मतदार संघात सर्व सामान्य जनतेची व्यक्तिगत कामे विशेषकरून गोरगरिबांची दवाखान्याची मोफत ऑपरेशन करून गरिबांना दिलासा दिलेला होता. तर, सार्वजनिक अनेक विकासाची कामे केलेली असल्याने कार्य कर्तृत्वातून माणसांच्या मनामध्ये घर करणाऱ्या आमदार राम सातपुते यांच्या आष्टी तालुक्यातील डोईठाण येथील मूळ घराकडे नेते व कार्यकर्त्यांची रिघ लागलेली होती. लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांनी मातोश्री चे सर्व विधी करून जनतेच्या सेवेसाठी पुन्हा सक्रिय झालेले होते. बघता बघता एक वर्ष पूर्ण झालेले आहे.

स्व. सौ जिजाबाई सातपुते यांच्या मृतात्म्यास सद्गती प्राप्त होऊन सातपुते परिवार यांना दुःखातून सावरण्याचे ईश्वर बळ देवो, हीच बारामती झटका परिवार यांचेकडून प्रथम पुण्यस्मरण निमित्त भावपूर्ण आदरांजली आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

5 Comments

Leave a Reply

Back to top button