आमदार पत्नी संस्कृतीताई राम सातपुते यांनी देशमुखवाडी ग्रामस्थांची मने जिंकली..
देशमुखवाडी (बारामती झटका)
भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांच्या धर्मपत्नी सौ. संस्कृतीताई राम सातपुते यांनी माळशिरस तालुक्याच्या पश्चिम भागातील आदर्शगाव देशमुखवाडी या गावाला सदिच्छा भेट दिलेली होती. देशमुखवाडी येथील महिला व युवक कार्यकर्ते यांच्याशी सुसंवाद साधून ग्रामस्थांची संस्कृतीताई सातपुते यांनी मने जिंकलेली आहेत.
संस्कृतीताई सातपुते यांनी देशमुखवाडी गावाला भेट दिली. त्यावेळेस थेट जनतेतील लोकनियुक्त बिनविरोध सरपंच सौ. प्रतिभा देशमुख, युवा नेते सुरज देशमुख, तुषार निकम, व्यंकट देशमुख, प्रमोद देशमुख, इंद्रजीत देशमुख, रणजीत यादव, दीपक जगदाळे यांच्यासह गावातील महिला व ग्रामस्थ यांच्याशी मनमोकळेपणाने सुसंवाद साधला. आमदार पत्नी संस्कृतीताई राम सातपुते यांनी सर्वसामान्य महिला व युवक कार्यकर्ते यांच्याशी सुसंवाद साधून गावामध्ये शिक्षण, आरोग्य, स्वच्छता, रस्ते, पाणी, लाईट अशा मूलभूत सुविधांविषयी सखोल चर्चा केली. चर्चेमध्ये अनेक विषयांचा परामर्श घेण्यात आला. महिलांशी हितगुज साधलेले असल्याने महिलांमध्ये आपुलकी प्रेम व जिव्हाळा निर्माण झालेला आहे. थेट महिलांशी सुसंवाद साधलेला असल्याने महिलांच्या मध्ये आपलेपणा निर्माण झालेला आहे.
संस्कृतीताई यांच्या वागण्या बोलण्यामधून साधेपणा महिलांना जाणवलेला होता. मन मोकळेपणाने चर्चा करून गावांमधील समस्या जाणून घेतलेल्या आहेत. आमदाराची पत्नी आहे असे त्यांनी किंचितही जाणून दिलेले नव्हते, त्यामुळे उपस्थित ग्रामस्थ, युवक, कार्यकर्ते विशेष करून महिला भगिनींची मने जिंकलेली आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९७६६७०३५१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.