ताज्या बातम्याशैक्षणिकसामाजिक

आनंदी लिनेस क्लबने अनोख्या पद्धतीने मराठी मातृभाषा दिन साजरा केला.

अकलूज (बारामती झटका)

माळशिरस तालुक्यातील सवतगाव येथील अंगणवाडीतील लहान वयातच मुलांना वाचनाची आवड निर्माण व्हावी, यासाठी अकलूजच्या आनंदी लिनेस क्लबने अनोख्या पद्धतीने मराठी मातृभाषा दिन साजरा केला आहे.

सध्याच्या काळात सगळीकडे पालक वर्ग आपल्या लहान मुलांना इंग्रजी भाषा शिकण्यासाठी प्राधान्य देत असल्यामुळे आपली मातृभाषा भाषा दुर्लक्षित होऊ लागली आहे. त्यामुळे आनंदी लेनेस क्लबने लहान वयातच मुलांना मातृभाषा वाचनाची गोडी लागावी म्हणून सवतगाव येथील अंगणवाडीतील मुलांना मराठी गोष्टीच्या पुस्तकाचे वाटप केले. त्याचबरोबर अंगणवाडी परिसरामध्ये वृक्षारोपण करण्यात आले. तसेच अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचे सहकार्य घेऊन आनंदी लेनेस क्लबच्या वतीने परिसरातील महिलांना आजची जीवनशैली आहार, विहार या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले.

आनंदी लिनेस क्लब सामाजिक क्षेत्रामध्ये आपला खारीचा वाटा म्हणून प्रत्येक वेळेस वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये सहकार्य करीत असते. यामध्ये नवीन एसटी स्टँडवर बांधलेला हिरकणी कक्ष, वेगवेगळ्या अंगणवाडीमध्ये मुलांसाठी खेळाचे वाटप, त्यांना पिण्यासाठी पाण्याचे वाटप, ऊसतोड कामगारांसाठी थंडीपासून संरक्षण होण्यासाठी स्वेटर व कपडे वाटप तसेच टेंभुर्णी येथील गोविंद वृद्धाश्रम येथील सर्व माता-पिता यांना आयड्रॉपचे वाटप व पंढरपूर येथील पालवी एड्सग्रस्त आश्रम या ठिकाणी जाऊन निराधार मुलांचा एक दिवसाचा आधार म्हणून त्यांच्यामध्ये सामील होऊन खाऊच्या स्वरूपात मदत केलेली आहे. त्याचबरोबर उन्हाळ्यामध्ये भटक्या जनावरांसाठी पाणी पिण्यासाठी टाक्या बसविण्यात आल्या आहेत.

अशा अनेक छोट्या छोट्या गोष्टींमध्ये नेहमीच कार्यरत असणारा हा आनंदी लिनेस क्लब क्लबच्या फास्ट डिस्ट्रिक प्रेसिडेंट सौ. छाया बोराडे, अध्यक्षा सौ. राजश्री जगताप, सचिव रश्मी ढोक, खजिनदार विद्या गिरमे, संगीता दोशी, वनिता जाधव, सपना दोशी व सर्व क्लब सदस्य यांच्या सहकार्याने हे सामाजिक उपक्रम राबवित असतात.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

Back to top button