आंधळी उपसा सिंचन योजनेच्या कामाची ग्रामविकास मंत्री ना. श्री. जयकुमार गोरे यांच्याकडून पाहणी
उपसा सिंचन योजनेचे काम मुदतीत पूर्ण करावे
सातारा (बारामती झटका)
आंधळी उपसा सिंचन योजनेमुळे माण तालुक्यातील गावांमधील शेतीच्या सिंचनासह पिण्याचा पाण्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे. उपसा सिंचन योजनेचे काम मुदतीत पूर्ण करावे असे निर्देश ग्रामविकास मंत्री ना. जयकुमार गोरे यांनी दिले.
माण तालुक्यातील आंधळी उपसा सिंचन योजनेच्या कामाची पाहणी ग्रामविकास मंत्री श्री. गोरे यांनी केली. याप्रसंगी केंद्रीय जल आयोग पाणी प्रकल्प सदस्य नवीन कुमार, पाटबंधारे विभागाचे मुख्य अभियंता हणमंत धुमाळ, अधीक्षक अभियंता अरुण नाईक, कार्यकारी अभियंता अमोल निकम, विजय पाटील आदी उपस्थित होते.
गुरुवर्य कै. लक्ष्मणरावजी इनामदार उपसा सिंचन योजना पूर्ण होण्यासाठी केंद्र शासनाने मोठी मदत केलेली आहे. माण तालुका हा दुष्काळी तालुका आहे. जानेवारी महिन्यापासून या तालुक्यातील लोकांना टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जातो. आंधळी उपसा सिंचन योजना याअंतर्गतच येत असून हे काम पूर्ण झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात सिंचनाच्या सुविधा निर्माण होणार आहेत. आंधळी उपसा सिंचन काम गुणवत्तापूर्ण व मुदतीत पूर्ण करावे, असेही ग्रामविकास मंत्री ना. श्री. जयकुमार गोरे यांनी पाहणी दरम्यान सांगितले.
जल आयोग पाणी प्रकल्प सदस्य श्री. कुमार म्हणाले, आंधळी उपसा सिंचन योजनेचे काम गतीने व गुणवत्ता पूर्ण करावे असे त्यांनी सांगितले.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.
situs bokep, bokep indo nonton