आंतर विद्यापीठ बास्केटबॉल स्पर्धेमध्ये रत्नाई कृषी महाविद्यालयाने पटकावले दुहेरी मुकुट”

अकलूज (बारामती झटका)
शिक्षण प्रसारक मंडळ संचलित महात्मा फुले कृषि विद्यापीठ संलग्नित रत्नाई कृषी महाविद्यालयाने आयोजित केलेल्या अंतर विद्यापीठ बास्केटबॉल स्पर्धा, अकलूज येथे विजयसिंह मोहिते पाटील क्रिडा संकुल येथे पार पडल्या असून त्यामधे रत्नाईच्या मुलांच्या संघाने 14 विरुद्ध 12 गुणांनी पदव्युत्तर महाविद्यालय, राहुरी संघांचा अटीतटीच्या सामन्यात पराभव करून पटकावले. तसेच कृषि महाविद्यालय, तळसंदे यांच्या मुलींच्या संघाबरोबर झालेल्या अंतिम सामन्यात रत्नाईच्या मुलींच्या संघाने उपविजेतेपद मिळवले असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. वाय. टी. जाधव यांनी दिली.
विजयसिंह मोहिते पाटील क्रिडा संकुल येथे झालेल्या या स्पर्धेत 18 मुलांच्या संघाने व 11 मुलींच्या संघाने सहभाग नोंदविला होता. यामध्ये मुलांच्या संघात, पदव्युत्तर महाविद्यालय, राहुरी यांचा द्वितीय क्रमांक व कृषि महाविद्यालय, बारामती यांच्या संघास तृतीय क्रमांक मिळाला. त्याचबरोबर मुलींच्या संघामध्ये कृषि महाविद्यालय तळसंदे यांस प्रथम क्रमांक, रत्नाई कृषि महाविद्यालय अकलूज यांस द्वितीय क्रमांक व कृषि महाविद्यालय, धुळे संघास तृतीय क्रमांक मिळाला. या बास्केटबॉल क्रिडा स्पर्धेतील सर्व विजेत्या संघांना चषक, पदक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

बक्षीस वितरण समारंभ महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे क्रिडा अधिकारी प्रा. दिलीप गायकवाड व अकलूज नगर परिषदेचे मुख्य अधिकारी श्री. दयानंद गोरे यांच्या शुभहस्ते विजेत्यांना पारितोषिक वितरण देऊन संपन्न झाला. श्री अनिल जाधव, शशांक गायकवाड, महेश ढेंबरे, उमेश शिकारे, अनिल तोरकर, कुमार जाधव, निखिल भोसले, सचिन इतका, वरूण पोमने व लखन मोरे यांनी पंच म्हणुन कामकाज पाहिले.
या बास्केटबॉल क्रिडा स्पर्धा यशस्वी करण्यासाठी रत्नाई महाविद्यालयाचे सभापती श्री. जयसिंह मोहिते पाटील, संस्थेचे अध्यक्ष श्री. संग्रामसिंह मोहिते पाटील, संचालिका कु. स्वरूपाराणी मोहिते पाटील, शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव श्री. अभिजीत रणवरे, सहसचिव श्री. हर्षवर्धन खराडे पाटील, सर्व संचालक मंडळ, स्थानिक व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य व प्राचार्य नलवडे यांनी रत्नाई कृषी महाविद्यालयातील दोन्हीही संघांचे व संघ व्यवस्थापक पांढरे सर यांचे अभिनंदन केले. त्याचबरोबर त्यांनी केलेल्या मौलिक मार्गदर्शन व सहकार्यामुळे ही स्पर्धा यशस्वीपणे पार पडू शकली.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.