ताज्या बातम्याराजकारणसामाजिक

आपुलकीचा नाष्टा आणि पंढरीची माणसं…!

पंढरपूरची माती, इथली माणसं आणि हा साधेपणा हेच आयुष्याचं खरं भांडवल आहे – आ. समाधानदादा अवताडे.

पंढरपूर (बारामती झटका)

पंढरपूर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे नियोजित कार्यक्रम आटोपल्यानंतर इडली एक्सप्रेस येथे माजी आमदार श्री. प्रशांत (मालक) परिचारक तसेच आपले सहकारी व कार्यकर्त्यांसोबत थांबून पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार समाधानदादा अवताडे यांनी नाष्टा केला.

कामाच्या गडबडीतून थोडा वेळ काढून असे एकत्र बसणं, साधा नाष्टा करणं आणि मनमोकळ्या गप्पा मारणं हे क्षण फार मोलाचे असतात.

दिवसभराच्या धावपळीत असे निवांत क्षण मनाला खूप समाधान देतात. गरम चहाचा घोट, साधा नाष्टा आणि आपल्या माणसांसोबतचे हसरे चेहरे पाहिले की सगळा थकवा कुठल्या कुठे पळून जातो. त्या काही क्षणांत पद, राजकारण किंवा काम बाजूला राहतं आणि माणुसकी, आपुलकी आणि स्नेह पुढे येतो.

पंढरीची मातीच मुळात आपुलकी शिकवते. इथली माणसं मनाने मोठी, बोलण्यात सरळ आणि वागण्यात प्रेमळ. म्हणूनच इथे घालवलेला प्रत्येक क्षण वेगळी ऊर्जा देतो. अशाच साध्या, मनापासूनच्या भेटीतून नातं अधिक घट्ट होतं आणि पुढच्या कामासाठी नवी उमेद, नवा उत्साह मिळतो.

पंढरपूरची माती, इथली माणसं आणि हा साधेपणा… हेच माझ्या आयुष्याचं खरं भांडवल आहे. अशी आ. समाधानदादा अवताडे यांची भावना आहे…

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

Back to top button
marsbahis hacklink market casibom