अकलूज माळेवाडी नगर परिषदेच्या भाजप महायुतीच्या प्रचाराच्या शुभारंभाचा मुहूर्त ठरला….

महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास व पंचायत राजमंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष पालकमंत्री नामदार जयकुमार गोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रचाराचा शुभारंभ…..
अकलूज (बारामती झटका)
अकलूज माळेवाडी नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 ची रणधुमाळी सुरू आहे. भाजप व महायुतीच्या प्रचाराचा शुभारंभ शनिवार दि. 22 नोव्हेंबर 2025 रोजी सायंकाळी पाच वाजता विजय चौक येथे महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास व पंचायत राजमंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष पालकमंत्री नामदार जयकुमार गोरे यांची प्रमुख उपस्थितीत व भाजप महायुतीच्या अनेक पदाधिकाऱ्यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रचाराचा शुभारंभ होणार आहे…
अकलूज माळेवाडी नगर परिषदेमध्ये भाजप व महायुतीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ. पूजा करण कोतमिरे व 13 प्रभागांमधील 26 नगरसेवक पदाचे उमेदवार यांच्या प्रचाराचा शुभारंभ मोठ्या थाटामाटात व उत्साही वातावरणात संपन्न होणार आहे. प्रचार शुभारंभास सर्वांनी उपस्थित रहावे, असे भाजप व महायुतीच्या वतीने अकलूजकरांना विनंती करण्यात येत आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



