आरोपींना तात्काळ अटक करा, फिर्यादी रामचंद्र थिटे यांची पोलीस प्रशासनाकडे मागणी.
फडतरी (बारामती झटका)
फडतरी ता. माळशिरस येथील फिर्यादी रामचंद्र थिटे यांनी नातेपुते पोलीस स्टेशन पोलीस प्रशासनाकडे आरोपींना अटक करण्याची मागणी वारंवार करूनही आरोपींना अटक झाली नाही. त्यामुळे त्यांनी पोलीस प्रशासनाला त्वरित अटक करण्याची मागणी केली आहे.
फडतरी येथील फिर्यादी रामदास थिटे यांनी रवींद्र रुपनवर, सचिन रुपनवर, अविनाश रुपनवर, नाना रुपनवर यांच्याविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. याबाबत हकीकत अशी की, फिर्यादी व आरोपी हे एकाच गावचे रहिवासी असून रवींद्र रुपनवर यांनी रामदास थिटे यांच्या शेतात आल्यावर फिर्यादी रामदास थिटे यांनी तू आमच्या शेतात का आला असे म्हटले. या कारणावरून आरोपींनी रामदास थिटे यांना शिवीगाळ करून हाताने व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली व दमदाटी केली. या मजकुराची फिर्याद आल्याने नाँ. काँ. रजिस्ट्री दाखल करून फिर्यादीत माहूकोर्टात परभारे दाद मागण्याची समज देऊन पुढील कार्यवाही करिता पोलीस हेडकॉन्स्टेबल/१५२२ कदम यांच्याकडे दिले आहे.
यानुसार भारतीय दंड संहिता १८६० नुसार ३२३, ५०४, ५०६ आणि ३४ अशी कलमे लावण्यात आली आहे. त्यामुळे फिर्यादी रामचंद्र थिटे यांनी पोलीस प्रशासनाकडे आरोपींना तत्काळ अटक करण्याची मागणी केली आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९७६६७०३५१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.
What an insightful and engaging read! The author did a fantastic job. I’m curious to know how others feel about this topic. Feel free to visit my profile for more interesting content.