आरपीआय आठवले गट महायुती बरोबरच राहणार असल्याचे रामदास आठवले यांनी जाहीर केले
श्रीपूर (बारामती झटका) बी. टी. शिवशरण यांजकडून
आरपीआय आठवले गट महायुतीबरोबरच राहणार आहे, तशी घोषणा या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी केली आहे. लोकसभा निवडणुकीत जरी पक्षाला काही तांत्रिक अडचणींमुळे जागा सोडली नसली तरी या पक्षाला केंद्रात मंत्रीमंडळात बढती देण्याची तसेच विधानसभा निवडणुकीत बारा जागा दोन महामंडळ तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये कार्यकर्त्यांना सन्मानाचे पद देण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समवेत आरपीआय आठवले गटाच्या शिष्टमंडळाने रामदास आठवले यांच्या नेतृत्वाखाली मुंबईमध्ये नुकतीच भेट घेतली. यावेळी अर्धा तास चर्चा सकारात्मक झाल्याने व आरपीआयला निवडणूक प्रक्रियेत स्थान दिले जाईल, कार्यकर्त्यांचा योग्य सन्मान केला जाईल, असे आश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी दिल्याचे आठवले यांनी म्हटले आहे.
रामदास आठवले यांनी पक्षाची भूमिका जाहीर करताना म्हटले आहे की, केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अत्यंत चांगले काम केले आहे. भारताला विकासाच्या वाटेवर नेताना सर्व उपेक्षित घटकांना सामावून घेऊन त्यांच्या प्रगतीसाठी व आत्मसन्मान उंचावण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करत असल्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सोडता येणार नाही. कॉंग्रेस व इतर पक्षानी सामाजिक तेढ वाढवण्याचे काम केले आहे. दलित उपेक्षित घटकांना सत्तेच्या दारापर्यंत पोहचू दिलं नाही. केंद्रात मला मंत्रीपद देण्यात सोनिया गांधी, शरद पवार यांनी असमर्थता दर्शवली होती, असे त्यांनी म्हटले आहे. एका खासगी दुर चित्रवाहिनीवर संवाद साधताना त्यांनी राजकिय, सामाजिक घडामोडींवर दिलखुलास गप्पा मारल्या. त्यावेळी त्यांनी मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर विश्वास असल्याने व देवेंद्र फडणवीस हे माझे चांगले मित्र आहेत, त्यांनी आश्वासन दिल्याने मी महायुतीबरोबरच राहणार असल्याचे जाहीर केले.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.