आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे मानवी नोकरी जाण्याची भीती – डॉ. यशवंत कुलकर्णी
श्रीपुर (बारामती झटका)
आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे भविष्यामध्ये मानवी नोकऱ्या जाण्याची भीती निर्माण होणार आहे. मानवापेक्षा कितीतरी पटीने अचूक आणि चांगल्या पद्धतीने काम करत आहे. अशी माहिती कॉम्प्युटरच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना पांडुरंगाचे कार्यकारी संचालक डॉ. यशवंत कुलकर्णी बोलत होते.
सारथी व एमकेसीएल यांच्या संयुक्त विद्यमाने मराठा समाजासाठी कॉम्प्युटर डिप्लोमा कोर्स मोफत शिकवण्याचे काम अकलूज येथील लोणकर कॉम्प्युटरमध्ये चालू आहे. विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर पडण्यासाठी इंडस्ट्रीज व्हिजिट पांडुरंग कारखान्यामध्ये अभ्यास दौरा आयोजित केला होता.
आर्टफिशिअल इंटेलिजन्स ही टेक्नॉलॉजी जेव्हापासून जगात आली आहे तेव्हापासून अक्षरशः खळबळ उडाली आहे. आर्टिफिशिअल इंटेलिजन्स हे एक तंत्रज्ञान आहे, ज्याचा वापर प्रत्येक क्षेत्रात करून अनेक क्षेत्र विकसित होऊ शकतात. ज्या क्षेत्रामध्ये वापर होईल, त्या क्षेत्रामध्ये काम सहजपणे होईल. पण, माणसांची जागा मशिन्स घेतील. आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे कार्य आणि लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता ही प्रणाली किंवा प्रोग्रामची विचार करण्याची आणि अनुभवातून शिकण्याची क्षमता आहे. एआय ॲप्लिकेशन्स गेल्या काही वर्षांमध्ये लक्षणीयरीत्या विकसित झाले आहेत आणि जवळजवळ प्रत्येक व्यावसायिक क्षेत्रात वापरले जाते. एआयमुळे अनेक लोकांना आपल्या नोकऱ्या गमवाव्या लागतील तसेच अनेक नवीन संधीही निर्माण होतील. दरम्यान, एक नवीन अभ्यास समोर आला आहे ज्यामध्ये असे सांगण्यात आले आहे आर्टिफिशिअल इंटेलिजन्स आपल्या नोकऱ्या घेईल का ? एआयमुळे भविष्यात आपल्या नोकऱ्या कितपर्यंत सुरक्षित राहतील का ? विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना पांडुरंगचे कार्यकारी संचालक डॉ. यशवंत कुलकर्णी बोलत होते
पांडुरंगचे कारखान्याचे चीप अकाउंटंट रवींद्र काकडे, डिस्टलरीज मॅनेजर आर. एस. पाटील, हेड टाइम कीपर सोपान कदम, उस विकास अधिकारी सोमनाथ भालेकर, कॉम्प्युटर इन्चार्ज तानाजी भोसले, ओम पवार, ओएस भीमराव बाबर, सेफ्टी ऑफिसर राहुल भालशंकर यांनी पांडुरंग कारखान्यामधील असणाऱ्या विविध प्रकल्पाची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली. त्यावेळी लोणकर कॉम्प्युटरचे व्यवस्थापकीय संचालिका लिना लोणकर व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.