आषाढीवारीत निर्मल वारीसाठी आठ हजार स्वयंसेवकांनी सेवा केली….

अकलूज (बारामती झटका)
पुण्यातील सेवा सहयोग संस्थेच्या माध्यमातून गेली 10 वर्षापासून राबविल्या जात असलेल्या निर्मलवारी उपक्रमात स्वयंसेवकांद्वारे वारीतील भाविकांना मार्गदर्शन करून नैसर्गिक विधीसाठी फिरत्या शौचालयाचा वापर करण्यास प्रवृत्त केले जाते. या मोहिमेत देहू ते पिराची कुरोली दरम्यान जवळपास ८ हजार स्वयंसेवक स्वयंस्फूर्तीने पालखी मुक्काम व विसाव्याच्या ठिकाणी काम करतात.
पुण्यातून दरवर्षी संत तुकाराम महाराज व संत ज्ञानेश्वर महाराज यांच्याबरोबर अनेक पालखी सोहळे आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे प्रस्थान ठेवतात. या सोहळ्यात किमान तीन लाखांहून जास्त भाविक असतात. या सोहळ्यातील विसावे, मुक्कामे काही ठिकाणी अर्ध्या छोट्या छोट्या खेड्यात असतात. नाष्टा व जेवणाची सोय होते परंतु, सुविधा अभावी नैसर्गिक विधीसाठी मात्र उघड्यावर जाण्यावाचून काही पर्याय नसतो.
वारीतील या अडचणीतून सन २०१५ मध्ये निर्मल वारीची संकल्पना पुढे आली. या उपक्रमात स्थानिक सेवाभावी वृत्तीच्या तरुण-तरुणींनी सहभागी केली जाते. सोहळा निघण्यापूर्वी एक महिना अगोदर पालखी मार्गावरील विसावा व मुक्कामाच्या ठिकाणी पाहणी करून व फिरत्या शौचालयाची ठिकाणे निश्चित करून त्याची संबंधित स्थानिक स्वराज्य संस्था व शासनाला माहिती दिली जाते. त्यानुसार फिरत्या शौचालयाचे शासनाकडून उपक्रम केले जातात. प्रत्येक ठिकाणी क्लस्टर प्रमुख एक ते दोन स्वयंसेवकांना नेमणूक करतो. त्या स्वयंसेवकांनी नियुक्त केलेल्या ठिकाणी सोहळ्याच्या मुक्कामी इतर विषयाच्या दिवशी रात्री दोन वाजता तिथे थांबून नैसर्गिक विधीसाठी येणाऱ्या भाविकांना शौचालयाचा वापर करणे विषयी मार्गदर्शन करण्याचे तसेच वीज, पाणी या सुविधांकडे लक्ष देणे तसेच कचरा संकलनामध्ये मदत केली जाते.
अकलूज मध्ये संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्या दरम्यान या प्रकारची जनजागृती गेली ३ वर्षांपासून केली जात आहे. प्रामुख्याने हे काम क्लस्टर प्रमुख शेखरजी माने हे पाहत आहेत. अकलूज शहरामध्ये २२ पॉईंट आहेत. याप्रमाणे स्थानिक व पुण्याहून आलेल्या ५० मिळून आम्ही ९४ स्वयंसेवकांनी निर्मल वारीचे काम केले. यामध्ये प्रामुख्याने संपर्कप्रमुख शिवाजी घोडके. स्वयंसेवक म्हणून निर्मल वारीत गेल्या ३ वर्षांपासून काम करत आहेत.
व हाती पडलेले काम करण्यास आनंद हा पैशात मोजता येत नाही. निर्मल वारीचे मुक्काम प्रमुख म्हणून विश्वजीत देशपांडे हे अकलूज या ठिकाणी मुक्कामाची व्यवस्था करतात.
तसेच खालीलप्रमाणे स्वयंसेवक प्रामुख्याने कामे करतात – संघाचे स्वयंसेवक प्रवीण रोडे, रोहित कुलकर्णी, नितीन लोखंडे, गणेश विभुते, रविकांत ननवरे, दीपक खंडागळे, योगेश जामदार.
तसेच पुण्याहून आलेले सेवासयोग संस्थेचे प्रमुख विशाल वेदपाठक हे प्रामुख्याने सर्व नियोजित ठिकाणांच्या स्वयंसेवकांनी केलेल्या कामाची पाहणी करतात.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



