ताज्या बातम्या

आष्टा येथील रेणुका देवीच्या यात्रेनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन.

सांगली (बारामती झटका)

आष्टा येथील श्री रेणुका (यल्लमा) देवीची मार्गशीर्ष पोर्णिमा व श्री दत्त जयंतीनिमित्त दि. ७ डिसेंबर ते १४ डिसेंबर या कालावधीत अखंड नामजप, यज्ञ, श्री गुरूचरित्र पारायणासह विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

शुक्रवार दि. १३ रोजी सायंकाळी ७.०० वाजता परडी सोडणे व रात्री १०.०० वाजता गाण्यांचा कार्यक्रम होणार आहे. शनिवार दि. १४ रोजी सकाळी ११.०० वाजता श्री देवीची महापूजा व नैवेद्य दुपारी २.०० वाजता, श्री रेणुका सहस्त्राहुती होम, श्री रेणुका देवीच्या पालखीची शहरातून मिरवणूक, सायंकाळी ५ ते ८, श्री रेणुका देवीच्या मंदिरासमोर महाप्रसाद व रात्री १० वाजता श्री रेणुका देवीचा अग्नीहोत्र प्रवेश (किच) असे कार्यक्रम होणार आहेत.

आष्टा शहर व परिसरातील भाविकांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री रेणुका देवी देवस्थान ट्रस्टच्या विश्वस्त मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button