पंचशील मंडळाच्या वतीने आंजली पाचकुडवे यांच्या स्मरणार्थ महिलांचा पुरस्काराने सन्मान

अंकोली (बारामती झटका) (दशरथ रणदिवे यांजकडून)
मोहोळ येथे जागतिक महिला दिनानिमित्त पंचशील मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात आदर्श कर्तृत्ववान अशा 32 महिलांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
महिला दिनानिमित मोहोळ येथे पंचशील मंडळाने आयोजित केलेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्य बहुजन शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आण्णासाहेब भालशंकर हे होते. यावेळी डॉ. अहिल्या गायकवाड, उद्योजिका संगीता फाटे, यशोदा कांबळे, दिलिप गायकवाड, पँथर नेते कुमार ढवळे, मंडळाचे अध्यक्ष शशीकांत ठोकळे आदी प्रमुख मान्यवरांच्या हस्ते महिलांना सन्मानित करण्यात आले. यामध्ये ज्या महिलांनी आपली मुले डॉक्टर, इंजिनियर घडवली, आदर्श शिक्षिका, आदर्श अंगणवाडी सेविका, आदर्श कार्यकर्त्या, परिवर्तनवादी चळवळीत पतींना सहकार्य करणाऱ्या, साथ देणाऱ्या अशा वेगवेगळ्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगीरी केलेल्या महिलांना दिवंगत अंजलीताई अशोक पाचकुडवे यांच्या स्मरणार्थ “रमाई आदर्श महिला गौरव पुरस्कार” देऊन गौरवण्यात आले. तक्षशीला गृहनिर्माण संस्थेच्या प्रांगणात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. अत्यंत बहारदार अशा या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. अशोक पाचकुडवे यांनी केले. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सारिका नाईकनवरे यांनी केले. तर उपस्थित मान्यवरांचे आभार संजय आठवले यांनी मानले. यावेळी शिक्षक महासंघाचे जिल्हाध्यक्ष युवराज भोसले, उपप्राचार्य प्रकाश शिंदे, रिपब्लिकन पीपल फ्रंटचे राज्य अध्यक्ष धनंजय आवारे, हणमंत भडकवाड, धनंजय जगताप, सुनील गायकवाड, आदर्श शिक्षिका शर्मिला साबळे, आशाताई शिंदे, संघमित्रा सुरवसे, चीतारे मॅडम, सामाजिक कार्यकर्त्या शोभाताई ससाने, सुवर्णा कांबळे यांच्यासह असंख्य महिला उपस्थित होत्या. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिवाजी आवारे, सुरज पाचकुडवे, संदीप सोनवणे, प्रशांत पाचकुडवे, दीपक मडिखांबे आदींनी परिश्रम घेतले.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.