निवडणूक आयोगाने दिलेल्या सूचना काटेकोरपणे अंमलात आणून येणारी विधानसभा निवडणूक सर्वांनी पार पाडावी – तहसीलदार एफ. आर. शेख

बार्शी (बारामती झटका)
निवडणूक आयोगाने दिलेल्या सूचना काटेकोरपणे अंमलात आणून येणारी विधानसभा निवडणूक सर्वांनी पार पाडावी, असे प्रतिपादन बार्शी विधानसभा मतदार संघाचे तहसीलदार एफ. आर. शेख यांनी केले.
आज बार्शी २४६ विधानसभा मतदारसंघातील निवडणूक अधिकारी व कर्मचारी याचे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. हे प्रशिक्षण प्रमोद गायकवाड निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आले होते. तालुक्यातील २००० अधिकरी व कर्मचारी यांना प्रशिक्षण देण्यात आले.

तहसिलदार एफ. आर. शेख यांनी सखोल व सूक्ष्म प्रशिक्षण देत असताना आपल्या मार्गदर्शनात सांगितले की, आयोगाने दिलेल्या सूचनांचे तंतोतंत पालन करत, आयोगाच्या मार्गदर्शक सूचना, गाईडलाईन यांचा आधार आपल्याला काम करताना घेत येणाऱ्या विधानसभा निवडणुकीची प्रक्रिया व्यवस्थित पार पडायची आहे. प्रत्येक अधिकारी व कर्मचारी यांना सर्व निवडणूक विषयक कामकाज पूर्णपणे आलेच पाहिजे, यासाठी आजच्या प्रशिक्षणात तयार करण्यात येणार आहे. आजच्या प्रशिक्षणात तालुक्यातील सर्व शिक्षक, अधिकारी, कर्मचारी यांनी सहभाग घेतला.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.