ताज्या बातम्याराजकारण

भाजपमध्ये राहून कमळाच्या पाकळ्या पांघरून नटरंगी नार कमळाबाईचा बुरखा फाटणार…

भारतीय जनता पक्षाचे अलंकार अंगावर घेऊन लग्न एका बरोबर, संसार दुसऱ्या बरोबर, नांदणं तिसऱ्या बरोबर, मन चौथ्या बरोबर तर विचार पाचव्याचा अशा नौटंकी पदाधिकाऱ्यांचा बंदोबस्त होणार…

मुंबई (बारामती झटका)

देशात व महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाच्या विचाराचे सरकार आहे. लोकसभा व विधानसभेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी भारतीय जनता पक्षात पदावर राहून भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांचे निष्ठेने व प्रामाणिकपणे काम केलेले नव्हते. लोकसभा व विधानसभेच्या निवडणुकीत जे झालं ते झालं मात्र, स्थानिक स्वराज्य संस्था, महानगरपालिका, नगरपरिषद, नगरपंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत पाठीमागील दिवस पुढे नको म्हणून भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय व राज्यातील नेतृत्वाने ठरवलेले आहे, भारतीय जनता पक्षात विविध पदांचे अलंकार अंगावर घेऊन लग्न एकाबरोबर, संसार दुसऱ्या बरोबर नांदण तिसऱ्याबरोबर, मन चौथ्या बरोबर तर विचार पाचव्याचा अशा नौटंकी पदाधिकाऱ्यांचा बंदोबस्त भारतीय जनता पक्ष करणार असल्याने भाजपमध्ये राहून कमळाच्या पाकळ्या पांघरून नटरंगी नार असणाऱ्या कमळाबाईंचा बुरखा फाटणार असल्याची राजकीय गोपनीय माहिती समोर आलेली आहे.

केंद्रात व राज्यात सरकार महायुतीचे आहे. खऱ्या अर्थाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून थेट सर्वसामान्य जनतेला लाभ देण्याकरता स्थानिक स्वराज्य संस्था महत्त्वाच्या असतात. यासाठी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, नवनिर्वाचित नूतन प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण, माजी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, यांच्यासह भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वापासून गाव पातळीवर काम करणाऱ्या वाड्यावस्त्यावरील शाखेत काम करणाऱ्या पदाधिकाऱ्यांची तळमळ सुरू आहे.

सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू झालेली आहे. भारतीय जनता पक्ष हा शिस्तीचा पक्ष आहे. यामध्ये पक्ष आदेश महत्त्वाचा मानला जातो परंतु, अनेक पदाधिकारी भारतीय जनता पक्षाची पदे घेऊन इतर पक्षाच्या संपर्कात राहून भारतीय जनता पक्षाच्या ध्येय धोरणाला गालबोट लावून पक्ष वाढीसाठी अडसर ठरत आहेत. मोजायला भारतीय जनता पक्षात मात्र गायाला दुसऱ्याच पक्षात असतात, असे भाजपमध्ये राहून पक्षाशी गद्दारी करणाऱ्यांचा बंदोबस्त केला तरच महायुतीच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पदाधिकाऱ्यांकडे सत्ता येऊ शकते. अशा लोकांचा बंदोबस्त करून भारतीय जनता पक्षाच्या बेरजेतून कमी केले तर दुसरे पदाधिकारी बेरजेमध्ये घेता येतील व स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये भाजप सह महायुतीच्या पक्षाचे झेंडे डौलाने डोलतील, यासाठी भाजपमध्ये राहून कमळाच्या पाकळ्या पांघरून नटरंगी नार कमळाबाईचा बुरखा फाडावा लागणार आहे. अशी निष्ठावान व प्रामाणिक कार्यकर्त्यांनी इच्छा बोलून दाखवलेली आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

Back to top button
marsbahis hacklink market casibom