अभिमान महाराष्ट्राचा, महाराष्ट्राचे विकास पुरुष मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस – महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे
देवेंद्रजी फडणवीस यांनी कर्तुत्वाच्या बळावर त्यांनी प्रत्येक वेळी दिलेली जबाबदारी सार्थकी लावली – केंद्रीय रस्ते, वाहतूक मंत्री नितीनजी गडकरी
नागपूर (बारामती झटका)
महाराष्ट्रातील जनसामान्यांनी जो प्रचंड विश्वास दिला त्या विश्वासाच्या बळावर आज मला मुख्यमंत्री होता आले, याची जाणीव असून एक सामान्य कार्यकर्ता म्हणून या विश्वासाला जीवापाड जपेन, असे भावोद्गार मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी नागपूर येथे आयोजित समारंभात काढले.
भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या औचित्याने आयोजित समारंभात मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके, कामगार मंत्री आकाश फुंडकर, राज्यमंत्री पंकज भोयर आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस घराण्याच्या जोरावर नव्हे तर त्यांच्यावर सोपविलेल्या जबाबदारीमुळे ते राजकारणात आले. आपल्या कर्तृत्वाच्या बळावर त्यांनी प्रत्येक वेळी दिलेली जबाबदारी सार्थकी लावली, या शब्दात केंद्रीयमंत्री नितीनजी गडकरी यांनी मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्याबद्दल गौरवोद्गार काढले.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.