ॲड. चि. प्रतीक काळे, नातेपुते आणि चि. सौ. कां. कार्तिकी उर्फ अंकिता ठवरे डोंबाळवाडी (खु.) यांचा शाही शुभविवाह सोहळा संपन्न होणार.
प्रेषक श्री. राजेंद्र धुळा काळे, संचालक धुळदेव पतसंस्था नातेपुते आणि श्री. विलास नारायण काळे चेअरमन, समाजभूषण नानासाहेब देशमुख विविध कार्यकारी सेवा सोसायटी नातेपुते ता. माळशिरस
नातेपुते (बारामती झटका)
नातेपुते ता. माळशिरस येथील स्वर्गीय धुळा अण्णा काळे यांचे नातू व श्री. राजेंद्र धुळा काळे यांचे पुतणे व स्वर्गीय ॲड. आनंदराव धुळा काळे रा. नातेपुते यांचे द्वितीय चिरंजीव ॲड. प्रतीक काळे आणि डोंबाळवाडी खुडूस येथील स्वर्गीय केरबा बाबू ठवरे यांची नात व श्री. एकनाथ केरबा ठवरे यांची सुकन्या चि. सौ. कां. कार्तिकी उर्फ अंकिता ठवरे यांचा शाही शुभविवाह सोहळा रविवार दि. 17/12/2023 रोजी दुपारी 12 वाजून 30 मिनिटे या शुभ मुहूर्तावर राज आनंद मंगल कार्यालय दहिगाव रोड, नातेपुते, ता. माळशिरस, येथे संपन्न होणार आहे. तरी या शाही शुभविवाह सोहळ्यास मित्रपरिवार व नातेवाईक यांनी उपस्थित रहावे असे नम्र आवाहन धुळदेव पतसंस्था नातेपुते संचालक श्री. राजेंद्र धुळा काळे आणि समाजभूषण नानासाहेब देशमुख विकास सेवा सोसायटी नातेपुते चेअरमन श्री. विलास नारायण काळे आणि समस्त काळे परिवार नातेपुते यांच्यावतीने करण्यात येत आहे.
शाही शुभविवाह सोहळ्यातील आनंदाचा व पवित्र मांगल्याचा क्षण, वेदिक सोहळ्यांचा, सुर सनईचा, ताल चौघड्यांचा, क्षण गुलाबी स्वप्नांचा, नाजूक क्षणांचा, रेशमी नात्यात गुंफण्याचा, क्षण पवित्र मंत्रोच्चाराचा, अग्निदेवतेच्या उपस्थितीत, सप्तपदींच्या साक्षीचा आणि तुम्हासारख्या लहानथोर मोठ्यांच्या अनमोल आशीर्वादाचा, तरी आपली उपस्थिती प्रार्थनीय असावी, याकरिता सौ. सिंधुबाई व श्री. भिमराव नारायण काळे, सौ. मंदाकिनी व श्री. राजेंद्र धुळा काळे, सौ. मंगल व श्री. दत्तात्रेय नारायण काळे, सौ. गीता व श्री. विलास नारायण काळे, माळशिरस पंचायत समिती सदस्य श्रीमती प्रतिभा अनंतराव काळे आणि समस्त काळे परिवार यांच्या वतीने आपणास शुभकार्यास उपस्थित राहण्याचे आवाहन केलेले आहे. आपणास निमंत्रण अथवा आमंत्रण हस्तेपर हस्ते मिळो अथवा न मिळो, हेच निमंत्रण समजून येण्याचे अगत्य करावे, असे समस्त काळे परिवार नातेपुते व राज आनंद मंगल कार्यालय नातेपुते, शेतकरी विकास केंद्र नातेपुते, राहुल फ्रुट गार्डन नातेपुते यांच्यावतीने नम्र आवाहन करण्यात येत आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९७६६७०३५१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.