अखेर आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचा लिलाव निघाला… पालकत्व घेतलेले यांच्या सुद्धा कारखान्याचा असाच लिलाव निघणार ?का…

तालुक्याचा कैवार (?) घेतलेल्या, आदिनाथचा पुळका असलेल्या मोहित्यांनी आता लिलावात आदिनाथ खरेदी करून चालवून दाखवावा, सभासद, ऊस उत्पादकांची मागणी
करमाळा (बारामती झटका)
साठच्या दशकापासून केवळ राजकीय वर्चस्वासाठी करमाळा तालुक्याच्या राजकारणात गटबाजीला खतपाणी घालत आपल्या आसुरी राजकीय महत्वकांक्षेपायी या तालुक्याचा सर्वांगीण विकास खुंटविणाऱ्या तत्कालीन मोहिते पाटलांचे सद्याचे वारसदार खासदार धैर्यशील व आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी आता लिलावात निघालेला आदिनाथ विकत घ्यावा व सक्षमपणे चालवून दाखवावा, अशी संतप्त प्रतिक्रिया आदिनाथच्या सभासद, ऊस उत्पादक शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे.
१९७१ साली सहकार महर्षींनी मुहूर्तमेढ रोवलेला आदिनाथ त्यांच्या हयातीत ११ फेब्रुवारी १९७९ पर्यंत आणि त्यांच्या पश्चात विजयदादांचे जिल्ह्याच्या, राज्याच्या राजकारणात वर्चस्व निर्माण झालेले असतानादेखील आदिनाथ सुरू होण्यास १९९३ साल का उजाडावे लागले, सुरुवातीपासून आदिनाथला गटबाजीचे ग्रहण का, कोणी लावले, चारी बाजूने मुबलक उसाचे क्षेत्र उपलब्ध असलेला हा कारखाना कुणाकुणाच्या करणीमुळे रसातळाला गेला आणि आज आदिनाथच्या या दुरावस्थेस मोहिते-पाटलांनी त्या त्या वेळच्या त्यांच्या वर्चस्वाच्या सोयीस्कर राजकारणापायी तालुक्यातील सगळ्याच संधीसाधू आणि गल्लाभरू नेते मंडळींचा कसकसा वापर करून घेतला हे जगजाहीर आहे. परिणामी या सगळ्यांची घरं तर भरली पण सहकाराचं व शेतकऱ्यांच्या मालकीच्या असलेल्या या मंदिराची वाट लागली आणि एवढं असूनसुद्धा गेली चाळीस वर्षे सुरू असलेली तालुक्यातील तत्कालीन आणि आजच्या सत्व:हीन पुढाऱ्यांची मोहिते पाटील यांच्या पुढे असलेली हुजरेगिरी, लाचारी सुरूच आहे. (या मध्ये मुजरेगिरी करणारे, सत्तेसाठी लाचारी पत्करलेले कोणकोण आहेत हे सर्वश्रुत असल्याने त्यांचा नामोल्लेख आवश्यक नसावा.)

साठच्या दशकापासून शहर, तालुका व जिल्ह्याच्या राजकारणातील आपल्या तत्कालीन तुल्यबळ प्रतिस्पर्धी यांना शह देण्यासाठी त्यांनी आजवर केलेल्या काटशहाच्या राजकारणात कुणाचं भले झालं आणि कुणाचं वाट्टोळे झालं हा मुद्दा गौण असून या खेळ्यांमुळे तालुक्याचा सर्वांगीण विकास तर खुंटलाच पण आदिनाथ भंगारमध्ये निघण्याचं महापाप हे मोहिते पाटील ओंजळीने ज्यांनी ज्यांनी स्वतःच्या स्वार्थापायी केलं त्या सर्वांचं तर आहेच, पण या पापात सिंहाचा वाटा हा अकलूजच्या बछड्यांचाच आहे हे कुणीही नाकारू शकणार नाही. अशी धारणा करमाळा वाशीयांची झालेली आहे
आजवरच्या आपल्या वर्चस्वाच्या राजकारणापायी त्यांनी अनेकांना सोयीनुसार बळ दिलं आणि कोणी वरचढ होतोय, आपल्याला न जुमानता स्वतंत्र अस्तित्व उभे करतोय असं दिसलं की त्याचे पाय ओढत त्याच्या विरोधकाला ताकद द्यायची… या आजवरच्या राजकारणापायी तालुक्याचा विकास सर्व तऱ्हेने ठप्प तर झालाच, सगळे नेते (?) सत्व: शून्य झालेच पण साठ-सत्तरच्या दशकात ज्यांचा तालुका, जिल्हा राजकारणातील वरचष्मा कमी करण्यासाठी मोहिते पाटील यांनी तालुका राजकारणात गटबाजीचे बीजारोपण केलं, त्यांचे कर्तबगार (?) वारस आज केवळ अजूनही कसंबसं टिकून असलेलं आपलं उरलं-सुरले राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी मोहिते पाटील यांची हुजरेगिरी करत राजकीय लाचारीत धन्यता मानत आहेत.
असो… आपला मुद्दा मुख्यतः सद्यस्थितीत आदिनाथचा आहे. आदिनाथची वाट त्या त्या वेळी कुणी लावली हे सगळ्या तालुक्याला ठाऊक असल्याने खरं तर हे नामोल्लेख करण्याची गरज नाहीये पण म्हणतात ना की… पब्लिक मेमरी इज व्हेरी शॉर्ट ! त्यामुळं या पापात सहभागी असलेल्या सर्वांचा उल्लेख करणं आवश्यक आहे. (आणि या सगळ्या पापाचे सूत्रधार कोण आहेत हे लिहिणं अपरिहार्य आहे.) १९८५ ला कट्टर निष्ठावंत असलेले रावसाहेब पाटील आमदार झाले. (तत्कालीन अनेक कारणं होती, त्यापैकी मोहिते पाटील छुपे समर्थन महत्वाचे होते). पुढे सोयीस्कर राजकारणासाठी रावसाहेब पाटलांची निष्ठा वगळता त्यांच्या नेतृत्वाच्या मर्यादा ओळखून त्यांच्यासह स्व. डॉ. प्रदीप आबा, स्व. बॉबीराजे राजेभोसले आदी अनेक निष्ठावंतांचा राजकीय काटा काढण्यात आला नि दिगंबरराव बागल यांचे नेतृत्व पुढं आणण्यात आलं आणि ते ज्यावेळी डोईजड होवू लागलं तेव्हां त्यांचाही राजकीय काटा काढण्यात आला पण.. पुण्याईच्या आणि मढेपिकाच्या जोरावर तगलेले जगताप, बागलांचे राजकारण लगेच संपत नाही हे बघून त्यांनी जगताप, बागलानी संधी, पदे देवून तालुका राजकारणात आणलेल्या नारायण पाटलांना हात आणि साथ दिली. पण हे सगळं होत असताना मोहिते पाटील यांच्या स्वार्थलोलुप राजकारणामुळे तालुक्याच्या विकासाशी, आदिनाथच्या भल्याशी… यांच्याशी त्यांना काहीही घेणं देणं नव्हतं हे आता आदिनाथ लिलावात निघाल्या कारणाने उघड झालेलं आहे.
खऱ्या विकासापासून सत्तेची साठमारी, निर्बुद्ध घराणेशाही आदींमुळे विन्मुख असलेल्या या तालुक्याच्या विकासाचा बॅकलॉग २०१७ पासून भरण्यास सुरुवात झाली आणि त्यावेळी तालुक्यातील सामान्य जनतेला पहिल्यांदा हे कळलं की विकास म्हणजे काय असतो ते. आणि २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत लोकाभिमुख, जनहितदक्ष, जन सेवेसाठी अहोरात्र कटिबध्द असलेल्या संजयमामा शिंदे यांना आमदार केलं (त्यावेळी नाव मोठं पण लक्षण खोटं.. असे काही राजकीय दिवाळखोरी निघालेले संधीसाधू डिमांड पूर्ण झाल्याने मामांच्या पाठीशी उभे राहिले आणि मामा आमदार झाले. खरं तर यात मामांचं कर्तृत्वच महत्वाचं ठरलं.) आणि मामांनी चाळीस वर्षांचा सगळा बॅकलॉग कोरोना, त्यानंतर आलेलं विरोधी सरकार या सगळ्यांना तोंड देत गट-तट न बघता मतदारसंघात अभूतपूर्व अशी ३६०० कोटी रुपयांची विकासकामे मंजूर करवून घेतली. पण गेल्या काही वर्षांत मोहिते पाटील प्रस्थापित घराणेशाहीला, जिल्हा राजकारणातील वर्चस्वाला यशस्वी सुरुंग लावण्यात यशस्वी ठरलेल्या मोहिते-पाटलांनी तालुक्यातील भंगार मालाला उठाव देवून २०२४ च्या निवडणुकीत त्यांना पराभूत केलं. त्यावेळी सर्वंकष विकासाला प्राधान्य देण्याऐवजी गटा-तटाचे, जातीयतेचे राजकारण करणाऱ्या भोंदू नेत्यांच्या (?) भूलथापांना बळी पडून पायावर धोंडा मारून घेतला ही वस्तुस्थिती असताना एप्रिल २०२५ मध्ये झालेल्या निवडणुकीत पुन्हा तीच घोडचूक केली आणि परिणामी आज आदिनाथ लिलावात निघाला.

आदिनाथ निवडणुकीच्या प्रचारादरम्यान मामांनी हे बोलून दाखवलं होतं की, आदिनाथ माझ्या ताब्यात दिला तर मी माझ्या पतिवर (क्रेडिटवर) चालू हंगाम सुरू करून आदिनाथ हळूहळू गर्तेतून बाहेर काढून सक्षमपणे चालवून दाखवतो. अन्यथा येत्या सहा महिन्यांत लिलालावत निघेल. पण दुर्देवाने (ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा) तसे घडलं नाही आणि पुन्हा एकवार हा तालुका फशी पडला.. आणि आज काय घडलं? आता आदिनाथ भंगारभावाने विक्रीला निघालाय. पण तो खरेदी कोण करणार? ज्यांनी स्वतःचे काढलेले खाजगी कारखाने डीसीसी बँक, स्वतः काढलेल्या पतसंस्था दिवाळखोरीत काढल्या ती नेतेमंडळी खरेदी करणार का? असा तीव्र संतापजनक सवाल तालुक्यातील शेतकरी वर्गाकडून विचारला जात आहे. तालुक्यातील एकजात भिकारचोट मंडळी ही निकामी असल्याने पश्चा:ताप होत असलेल्या ऊस उत्पादक सभासदांचे डोळे हे संजयमामांच्या डोळस नेतृत्वाकडे आजमितीला लागून राहिलेले आहेत ! करमाळा तालुक्याचे पालकत्व घेणाऱ्यांचा सुद्धा कारखाना आदिनाथ सारखीच अवस्था होईल असेही कारखाना क्षेत्रामध्ये बोलले जात आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



